नवी दिल्ली SC Rejected City Renaming Petition : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याविरोधात काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठानं दोन शहरांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.
अधिसूचनेच्या वैधतेला न्यायालयात आव्हान : महाराष्ट्र शासनानं औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव शहर करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यानं महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेच्या वैधतेला न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, अशा प्रकरणांवरून वेगवेगळ्या लोकांमध्ये मतभेद असू शकतात. तर काहीजण सहमत असू शकतात. तर काही शहरांच्या नावातील बदलांशी असहमत असू शकतात.