महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 10:58 PM IST

ETV Bharat / state

फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा हट्ट सोडावा, ३५ लाख भाजपा कार्यकर्त्यांची मागणी - Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत पुन्हा जोमाने काम करणार आणि भाजपाला महाराष्ट्रात पुन्हा नंबर एक प्राप्त करून देणार असा पवित्रा घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेने महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्ते नाराज झाले आहेत. आज मुंबईत भाजपा मुंबई व प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी त्यांना पुन्हा विनंती करण्यात आली.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)

मुंबईDevendra Fadnavis :याप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की, महाराष्ट्र भाजपाची मुंबई व प्रदेश कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील भाजपाच्या ३५ लाख कार्यकर्त्यांच्यावतीनं देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी जो सरकार मधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा. कारण ही राज्यातील ३५ लाख भाजपा कार्यकर्त्यांची सामूहिक जबाबदारी होती. आता तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाल्यावर मोदी सुरुवातीचे १०० दिवस अतिशय टास्कवर काम करणार आहेत. म्हणून या १०० दिवसात मोदीजी जे निर्णय घेतील ते निर्णय, त्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत गरज आहे. फडणवीस यांनी सरकारमध्ये राहून महाराष्ट्र व संघटनेकडेही लक्ष द्यावं अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीसांविषयी बोलताना (ETV Bharat Reporter)


का हवेत देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये? :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेसाठी, समाजासाठी जोमाने काम करावे. जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल व मोदीजी यांच्या ५ वर्षांच्या कामाचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला होईल. यामध्ये थोडंफारसुद्धा कमी जास्त झालं तर त्याचा फटका महाराष्ट्रातील जनतेला बसेल. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या काळात मोदी सरकारच्या योजना बंद पाडण्याचं काम त्यांनी केलं होतं. उद्या ते अन्नधान्याच्या योजना बंद करतील. आयुष्यमान भारत योजना बंद करतील. आरोग्य योजना, किसान सन्मान योजना यासारख्या जनतेच्या हिताच्या योजना ते बंद करतील. म्हणून त्यांना विनंती केली आहे की, तुम्ही सरकारमध्ये राहा आणि मोदी सरकारच्या विविध योजना महाराष्ट्रातील जनतेला तळागाळापर्यंत पोहचवा, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

हेही वाचा:

  1. हैदराबादमधील इस्थर अनुह्या असो की शक्ती मिल गँगरेप, हजारो गुन्हेगार 'या' चित्रकारामुळे पोलिसांच्या जाळ्यात - Sketch Artist Nitin Yadav
  2. सरकारला पावसाळी अधिवेशन गुंडाळायची घाई, तर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी - Monsoon Session Period
  3. आयटीचा जॉब सोडून तरुण वळला शेतीकडं; पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या शेतीतून कमवतोय लाखो रुपये - White Jamun Farming

ABOUT THE AUTHOR

...view details