कोल्हापूर Ajit Pawar Vishalgad Violence Visit : कोल्हापुरातील किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागलं. विशाळगडाजवळील गजापुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी गजापुरात पोहोचले. यावेळी त्यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला.
नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV BHARAT Reporter) कारवाई होणार : "विशाळगडाच्या पायथ्याला असलेल्या गजापूर गावात झालेल्या हिंसाचारात ज्या नागरिकांचं नुकसान झालं, त्यांना शासनाकडून मदत केली जाईल. कोणावर अन्याय केला जाणार नाही. विशाळगडावरील अतिक्रमण काढलेले आहे. ज्या 13 अतिक्रमणावर स्थगिती आली, ती अतिक्रमण काढली नाहीत, रहिवाशी अतिक्रमण सध्यातरी काढणार नाही. ती सप्टेंबरनंतर न्यायालयाच्या नियमात राहून काढले जाईल. ज्यांनी कायदा हातात घेतला, त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
अतिक्रमण काढले जाईल : "विशाळगडाच्या मुसलमानवाडीमधील नागरिकांचा अतिक्रमणाशी काही संबंध नव्हता, तरीही जमावाने तोडफोड केली. या हिंसाचारात जवळपास 2 कोटी 85 लाख रुपयांचं नुकसान झालं. पोलिसांकडून सर्व तपास सुरु आहे. घटनेचा व्हिडिओ, पोस्ट पाहून शहानिशा करण्याचं काम सुरू आहे. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राज्यातील सर्वच किल्ल्यांवर जे अतिक्रमण आहे, ते काढले जाईल. पण इतिहासात ज्याबाबत उल्लेख आहे तेही पहावे लागेल. सर्वत्र अतिक्रमण असेलच असे नाही. सर्व बाबी तपासून अतिक्रमण काढले जाईल," असं अजित पवार म्हणाले.
माजी खासदार संभाजीराजेंची चर्चा व्हायला हवी होती : "विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी जाणार असल्याचं जाहीर केल्यानंतर स्वराज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत प्रशासनानं चर्चा केली होती. सरकारनं दोन दिवसांचा वेळ मागितला होता. पण त्यांनी ते ऐकलं नाही," असंही अजित पवार म्हणाले. पाच दिवसानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार राजेश पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन नागरिकांशी चर्चा केली.
हेही वाचा -
- देवेंद्र फडणवीस -अजित पवारांचं हेलिकॉप्टर भरकटलं : अजित पवारांनी सांगितला थरारक अनुभव - Devendra Fadnavis
- 'लाडक्या बहिणी'साठी अजित पवारांची मोठी घोषणा; यंदाच्या रक्षाबंधनला भेटणार मोठी ओवाळणी - Mazi Ladki Bahin Yojana
- मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा; रायगडावर अडकलेल्या शेकडो पर्यटकांची सुटका, मुख्यमंत्र्यांचं मुंबईकरांना आवाहन - Maharashtra Rain Update