मुंबई-विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं लढवलीयं. यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनीदेखील मोठे कष्ट घेतले. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच नाव पुढ केले जाईल. मात्र, या विषयी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घ्यायचा आहे. मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याची भावना राज्याचे मंत्री तथा शिवसेनेचे नेते दिपक केसरकर यांनी व्यक्त केली. ते शिर्डीत साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलत होते.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मध्ये विद्यमान शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी शिर्डीत साईबाबा दर्शन घेतले. त्यांनी लवकरच सत्तास्थापन होणार असल्याचे संकेत दिले.
ठाकरेंच्या बोलण्याला अर्थ नाही-उद्धव ठाकरेंनी बोलताना ते फडण'वीस' असतील तर आमच्याकडेदेखिल वीस (आमदार) असल्याची खोचक टिप्पणी केली होती. यावर केसरकरांनी ठाकरेंना चांगलच सुनावलंय. मंत्री केसरकर म्हणाले, " उद्धव ठाकरे निवडणुकीत शंभरी पार करू शकले नाहीत. फडणवीसांनी 130 आमदार निवडून आणले. हे काही सोपं काम नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी यात मोदींचा करिश्मा , फडणवीसांची मेहनत आणि एकनाथ शिंदेनी खांद्याला खांदा लावून काम केलंय. तसेच प्रेरणास्थान बाळासाहेब ठाकरे आहेत."