मुंबईHijab Ban Issue :9 मुस्लिम विद्यार्थिनींनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर व न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आमचा हिजाब, नकाब, बुरखा परिधान न करण्याचा आदेश म्हणजे मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न नसून महाविद्यालयात समान ड्रेस कोड लागू करण्याचा हेतू असल्याचं स्पष्टीकरण महाविद्यालयातर्फे बाजू मांडताना देण्यात आले. चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन.जी. आचार्य व डी. के. मराठे महाविद्यालयातील हिजाबबंदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. 9 मुस्लिम विद्यार्थिनींनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर व न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
खंडपीठाचा वकिलाला प्रश्न :महाविद्यालयाने हिजाब, नकाब, बुरखा, टोपी परिधान करण्यावर बंदी घातली होती. महाविद्यालयाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी याला आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे. महाविद्यालयाच्या या निर्णयामुळे आमच्या मूलभूत, धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचा व खासगीपणा धोक्यात येत असल्याचा आक्षेप विद्यार्थिनींनी घेतला. हिजाब घालणे ही धार्मिक अत्यावश्यक बाब असल्याचे कोणत्या धार्मिक प्रमुखांनी सांगितले, असा प्रश्न खंडपीठाने यावेळी याचिकाकर्त्या वकिलांना विचारला. तसेच महाविद्यालयाला अशा प्रकारे बंदी लादण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न विचारला.