महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहूल गांधींच्या प्रश्नांबाबत अजित पवार म्हणाले... - AJIT PAWAR CRITICIZES RAHUL GANDHI

पुण्यातील विधान भवन इथं बोलत असताना उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

AJIT PAWAR CRITICIZES RAHUL GANDHI
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2025, 10:33 PM IST

पुणे :लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील मतदारांच्या यादीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे आहेत, असा प्रश्नदेखील राहुल गांधींनी उपस्थित केला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "राहुल गांधी यांनी त्यांची टीम नेमून तपास करावा. उद्या दिल्लीचा निकाल लागल्यावर जे हारतील ते असंच बोलतील हा रडीचा डाव असून याला काहीच अर्थ नाही. जनता जनार्धन सर्वस्वी आहे. कार्यकर्ते निराश होऊ नये म्हणून आपल्याला मतदान मिळाल्याचं हा प्रयत्न आहे." अस अजित पवार म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील विधान भवन इथं विविध बैठकांचा आयोजन करण्यात आलं होते यावेळी त्यांना याबाबत विचारला असता त्यांनी आपलं मत व्यक्त केल.

महिलांना एकाच योजनेचा लाभ घेता येणार :अजित पवार यांना लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, "ज्यावेळेस लाडकी बहीण ही योजना आणली त्यावेळेस दोन लाख 50 हजार पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ द्यायचा होता. परंतु, या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी आम्हाच्याकडं वेळ कमी होता. आतापर्यंत ज्या कोणालाही पैसे देण्यात आले आहे त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. पण, आता ज्या महिलांकडं चार चाकी वाहन असतील, ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तसंच ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेत असतील अशा महिलांना एकाच योजनेचा लाभ भेटणार आहे. हे आधार कार्ड शी लिंक करण्यात येत असून पुढील कारवाई देखील करण्यात येणार आहे.

या सगळ्या कल्पोकल्पित बातम्या : अजित पवार यांना शिवभोजन थाळी बंद करणार असल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "अजून अर्थसंकल्प मांडला नाही. तुम्ही सांगता तेव्हा मला अशी माहिती समजते. या सगळ्या कल्पोकल्पित बातम्या आहेत, असा काही निर्णय झालेला नाही."

माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV Bharat Reporter)

अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका : राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेच्या बाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली, तेव्हा आम्ही रडत नाही बसलो" अस म्हणत पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

तपासणीनंतर कारवाई होणार : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलीसांकडं तक्रारी आल्या आहेत. राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजाबद्दल असं विधान करायला नको होते. पोलीस प्रकरणाची तपासणी करून कारवाई करतील."

हेही वाचा :

  1. मंत्रालयातील 'एफआरएस' प्रणालीमुळं सामान्यांना त्रास; आता आमदारांच्या 'पीए'नाही प्रवेशाचा मनस्ताप
  2. बुलढाण्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीचा एन्काऊंटर करण्याची आमदार मिटकरींची मागणी
  3. बोईसरमध्ये कालबाह्य खतांची विक्री; शेतकऱ्यांच्या पिकांना फटका, कृषी विभागाचं दुर्लक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details