मुंबई- उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील नेते आणि माजी आमदार राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण अखेर राजन साळवी हे आता शिंदेंच्या शिवसेनेत उद्या (गुरुवारी) दुपारी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यात प्रवेश करणार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून पक्षात आपली दखल घेतली जात नाही. आपल्याला डावललं जात असल्यानं राजन साळवींनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच साळवी हे भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु उद्या त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. साळवींच्या प्रवेशावरून शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी राजन साळवींवर टीकास्त्र डागलंय.
सामंत बंधूंना शह देण्यासाठी... : राजन साळवी हे मातोश्रीवर येऊन गेले होते. उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी एक तास चर्चा केली. त्यावेळी आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं साळवींनी म्हटले होते. पण यांच्या येण्याने तोटा-फायदा याचे गणित मांडले आणि याचा काही फायदा होणार नाही म्हणून भाजपाने त्यांना त्यांच्या पक्षात घेतले नाही. भाजपाने साळवींना त्यांची जागा दाखवली. पण आता कोकणात उदय सामंत आणि किरण सामंत बंधूंना शह देण्यासाठी, त्यांना आव्हान देण्यासाठी राजन साळवींना शिंदे गटात प्रवेश दिला जात आहे. खरं तर ही शिंदेंची खेळी आहे. सामंत बंधूंना आवर घालण्यासाठी साळवींना शिंदे गटात घेतले जातेय, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिलीय.
पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडले नाहीत : राजन साळवींनी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. राजीनामा दिल्यानंतर पक्षात आपणाला मान-सन्मान मिळाला नाही. आपली दखल घेतली गेली नाही, असा आरोप केलाय, यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, पक्ष सोडायचा आहे म्हणून ते काहीही कारणं देत आहेत. आमदारकीला त्यांचा पराभव झालाय. तेव्हापासून त्यांची ही तळमळ सुरू आहे. माझे नशीब की त्यांनी पराभवाचे खापर विनायक राऊत यांच्यावर फोडले नाही, असा टोलाही राऊतांनी राजन साळवींना लगावला. राजन साळवी हे निवडणुका होऊन चार महिने झाले तरी अजून पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडलेले नाहीत, अशी टीका विनायक राऊतांनी राजन साळवींवर केलीय.
हेही वाचा-
सामंत बंधूंना शह देण्यासाठी मिंधेंची खेळी, राजन साळवींच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर विनायक राऊत कडाडले - EKNATH SHINDE PARTY
उद्या राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. साळवींच्या प्रवेशावरून शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी राजन साळवींवर टीकास्त्र डागलंय.
![सामंत बंधूंना शह देण्यासाठी मिंधेंची खेळी, राजन साळवींच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर विनायक राऊत कडाडले Shiv Sena leader Vinayak Raut](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12-02-2025/1200-675-23529898-thumbnail-16x9-vinayakrautupdate-12-aspera.jpg?imwidth=3840)
![ETV Bharat Marathi Team author img](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 12, 2025, 7:20 PM IST