महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला अधिकाऱ्यानं संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा, सहा जणांना अटक - Nagpur Hit And Run

Nagpur Hit And Run : गडचिरोलीतील नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक अर्चना पुट्टेवारनं संपत्तीसाठी सासऱ्याचा काटा काढल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. त्यात तिच्या भावासह दोन सुपारी किलरचा सहभाग आढळून आला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.

Purushottam Puttewar
पुरुषोत्तम पुट्टेवार (Reporter ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 9:50 PM IST

नागपूरNagpur Hit And Run:सासऱ्याची कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीसाठी सुनेनं सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुमध्ये घडली आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार, असं हत्या झालेल्या सासऱ्याचं नाव आहे. तर, हत्तेची सुपारी देणाऱ्या सुनेचं नाव अर्चना पुट्टेवार असल्याचं उघड झाल आहे.

रवींद्र सिंघल यांची पत्रकार परिषद (Reporter ETV BHARAT)

दोन भाडोत्री सुपारी किलरला अटक :अर्चना पुट्टेवार या गडचिरोलीत टाऊन प्लॅनिंग विभागात उच्चपदस्थ अधिकारी आहे. अर्चनानं तिचा भाऊ प्रशांतच्या मदतीनं सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांना भर रस्त्यामध्ये भरधाव कारनं चिरुडन हत्या केली. त्यानंतर तब्बल १८ दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी अर्चना पुट्टेवारसह तिचा भाऊ प्रशांत वाटेकर तसंच दोन भाडोत्री सुपारी किलरला अटक केली आहे.

भावाच्या मदनीतनं हत्तेचा कट : नागपूर शहरातील बालाजी नगर परिसरात 22 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, हा अपघात नसून सुपारी किलिंग असल्याचं तपासात उघड झालं आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची नागपुरात कोटींची संपत्ती आहे. पुरुषोत्तम यांचा मुलासोबत संपत्तीवरून वाद न्यायालयात सुरू होता. पुरुषोत्तम संपूर्ण संपत्ती दुसऱ्या मुलांना देतील या भीतीनं सून अर्चना पुट्टेवार यांनी तिचा भाऊ प्रशांत वाटेकर यांच्या मदतीनं सासऱ्याच्या हत्येचा कट रचला.

चालकाला दिली लाखोंची सुपारी :अर्चनाला सासऱ्याचा यांचा काटा कायमचा काढायचा होता. मात्र, त्यासाठी एका सुपारी किलरची आवश्यकता होती. यासाठी अर्चनानं तिचा भाऊ प्रशांतला याबाबत कल्पना दिली. त्यानंतर प्रशांतनं सुपारी किलर म्हणून सार्थक नावाच्या इसमाला जबाबदारी सोपवली. त्याला त्यांनी चालक म्हणून कामावर ठेवलं. सार्थकनं दुसऱ्या आरोपीच्या मदतीनं २२मे रोजी भरधाव कारनं पुरुषोत्तम पुट्टेवार यांना चिरडल्यानंतर पळ काढला होता.

यापूर्वी दोन वेळा प्रयत्न फसला :मुख्य आरोपी अर्चनाच्या निर्देशावरून सार्थकनं दोनदा पुरुषोत्तम पुट्टेवार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी ते थोडक्यात वाचले होते. त्यानंतर आरोपींनी त्यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशानं एक कार विकत घेतली. त्यानंतर त्यांनी 22 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अंगावर कार घालत त्याची हत्या केली.

हत्याकांडात अर्चनासह सहा आरोपींचा सहभाग : पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणी सून अर्चनाचा सहभाग असल्याचं उघड झालंय. त्यासोबतच तिनं भाऊ प्रशांतसह सार्थक आणि अन्य आरोपीची मदत घेतली. याशिवाय अर्चनाची पर्सनल सेक्रेटरी पायल नागेश्वर हिचा देखील सहभाग आढळून आल्यानं पोलिसांनी एकूण सहा आरोपीना अटक केली आहे.

'हे' वाचलंत का :

  1. वृत्तवाहिनीच्या अँकरला मारहाण, कपडेही फाडल्याचा आरोप; दिल्ली देहराडून महामार्गावर नराधमांचं 'तांडव' - News Channel Anchor Molested
  2. शिवखोडी यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवादी हल्ला, 10 जण ठार - TERRORIST ATTACK ON PASSENGER BUS
  3. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; सुरक्षा कर्मचारी जखमी - Militants Attack on CM Convoy

ABOUT THE AUTHOR

...view details