प्रतिक्रिया देताना डॉक्टर मंगल ताठे छत्रपती संभाजीनगर Mobile Overuse Problems : मोबाईलचे दुष्परिणाम जगजाहीर झालेत. अतिवापरामुळं त्याचा परिणाम विशेषतः लहान मुलांवर अधिक दिसून येतोय. एकाच जागी बराच वेळ बसून असल्यानं किंवा जेवणावर नियंत्रण नसल्यानं पचन क्रियेवर परिणाम होता. यामुळं मुळव्याधी सारखे आजार जे वयाच्या तिशी किंवा चाळिशीनंतर होत असायचं ते आता लहान वयात सुरू झाल्याची माहिती, डॉ. मंगल ताठे यांनी दिली.
लहान मुलांमध्ये वाढत आहेत आजार : बदलत्या जीवनशैलीमुळं माणसांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झालाय. त्यात कोरोना काळात मोबाईलचा वापर वाढलाय. प्रत्येक कामासाठी आणि विरंगुळा म्हणून सतत मोबाईलचा वापर वाढला आणि त्याची सवय लागली. त्यात लहान मुलांचा अभ्यास देखील ऑनलाईन सुरू झाल्यानं कमी वयात अनपेक्षितपणे मोबाईल हातात आला. त्यामुळं अभ्यासाव्यतिरिक्त खेळ आणि इतर ज्ञान घेण्यासाठी देखील मोबाईल हाताळण्याची सवय लागली. सतत एका ठिकाणी बसून पोटाचे आजार वाढले आहेत.
लहान मुलांची पचनक्रिया बिघडत आहे : पचनक्रिया बिघडल्यानं पोट साफ होण्यास अडचण येत आहे. त्यामुळं मुळव्याधीसारखे आजार सुरू होतात. यामध्ये लहान मुलांचं प्रमाण देखील लक्षणीय मानलं जातय. डॉक्टरांकडं येणाऱ्या तक्रारींमध्ये लहान मुलांचं पोट साफ होत नाही, शौचास गेल्यास पोट दुखतं अशा अनेक तक्रारी येतात. मैदानी खेळ कमी झाले आहेत. त्यामुळं शरीरात असलेलं अन्न पचत नाही. त्याचाच परिणाम अधिक प्रमाणात दिसून येतोय, असं देखील डॉ. मंगल ताठे यांनी सांगितलं.
मोबाईलमुळं आहारावर नियंत्रण राहिलं नाही: लहान मुलांमध्ये नाही तर कुटुंबातील प्रत्येकालाच मोबाईल वापराची सवय लागलीय. विशेषतः महिलांमध्ये रिल्स पाहण्याची सवय वाढत चालल्यानं, जेवण तयार करताना देखील त्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. परिणामी पचन क्रिया व्यवस्थित होत नसल्यानं पोटाचे विकार वाढले आहेत. त्यामुळं मुळव्याधीसारखे आजार होत आहेत. त्याकडं अधिक लक्ष न दिल्यानं त्याचं स्वरुप गंभीर होत आहे अशी माहिती, डॉ मंगल ताठे यांनी दिलीय.
हेही वाचा -
- संजय राऊतांच्या निशाण्यावर पुन्हा मोदी-शाह, म्हणाले ईदी अमिन हा नरभक्षक, ते... - Sanjay Raut News
- खैरेंसारखा उमेदवार म्हणजे दुर्दैव, जुन्या शिवसैनिकानं व्यक्त केली भावना - Lok Sabha Elections
- प्रकाश आंबेडकरांचा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न फसणार? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचं मत - PRAKASH AMBEDKAR