बुलढाणा : पत्नीच्या अनैतिक संबंधात पती अडसर आल्यानं पत्नीनं पतीला जाळल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. पतीनं मृत्यूआधी दिलेल्या जबाबानंतर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणधीर हिंमत गवई, असं मृत पतीचं नाव असून, ते माजी सैनिक होते. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
दोघांमध्ये झाला होता वाद :माजी सैनिक रणधीर गवई हे मेहकर तालुक्यातील पाचला येथील रहिवासी होते. 13 जानेवारी रोजी बुलढाणा येथील तार कॉलनीमध्ये ते पत्नी लता गवई यांच्याकडं गेले. तिथे त्यांच्यात काही कारणामुळं वाद झाला आणि या वादामुळंच पत्नीनं पतीला पेटवून दिलं, असा आरोप मृताच्या आईनं केला.
प्रतिक्रिया देताना रंजना गवई (ETV Bharat Reporter)
90 टक्के भाजल्यामुळं झाला मृत्यू :शेजारील नागरिकांनी मृतक रणधीर गवईच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गंभीररित्या जखमी रणधीर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. परंतु रणधीर गवई 90 टक्के भाजल्यामुळं त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. उपचारादरम्यान रणधीरचा मृत्यू झाला. अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यानं पत्नीनं जिवंत पेटवून दिल्याचा मृत्यूपूर्व जबाब पतीनं दिल्यानंतर शहर पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अप.क्र 51/2025, कलम 109 (1) BNS प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास एपीआय बोस करत आहेत. या घटनेनंतर पत्नी लता गवई फरार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
न्याय देण्याची केली मागणी :आज रणधीर गवईवर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. बुलढाणा शहर ठाण्यामध्ये मृतक रणधीर गवईचे आई-वडील पोलिसांची भेट घेतली आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करुन आम्हाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली.
हेही वाचा -
- शाळेत खराब केळी मिळाल्याचा जाब विचारल्यानं मुख्याध्यापिकेनं 8 वर्षीय विद्यार्थ्याला वर्गात बोलावलं अन् केलं भयंकर कृत्य - Buldana crime news
- Buldhana Crime News : आधी बलात्काराचा गुन्हा दाखल, आता पीडिता म्हणते 'तसे काही झालेच नाही'
- Buldhana Crime News: खळबळजनक! १० वर्षीय भाचीवर मामाने केला बलात्कार; नात्याला काळीमा फासणारी घटना