महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कन्नड शाळांमध्ये मराठी शिक्षकांच्या नियुक्तीवरून वाद; कर्नाटक सरकारनं घेतली गंभीर दखल - Marathi teachers Controversy

Marathi teacher dispute : महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिक्षकांच्या नियुक्तीबद्दल बेळगावमधील कन्नड संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटक राज्य सरकारनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी महाराष्ट्राशी समन्वय साधून हस्तक्षेप करावा, अशी विनंती संघटनांनी केली आहे.

Controversy over appointment of Marathi teachers
मराठी शिक्षकांच्या नियुक्तीवरून वाद (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 10:18 PM IST

सांगलीMarathi teacher dispute : सांगली जिल्ह्यातील कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील 10 कन्नड माध्यमाच्या शाळांमध्ये 11 मराठी माध्यम शिक्षकांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळं आता मराठी माध्यमाचे शिक्षक कन्नड शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणार का? असा प्रश्न सांगली जिल्हा परिषदेच्या विचित्र कारभारामुळं उपस्थित होत आहे.

विक्रम सावंत यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

"जत तालुक्यातील कन्नड शाळेतील शिक्षकांच्या नियुक्तीप्रकरणी कर्नाटक सरकारनं गंभीर दखल घेतलीय. 25 जून रोजी कर्नाटक सीमा विकास मंडळाचे सचिव जत तालुक्याचा दौरा करणार आहेत. सीमा विकास मंडळाचे सचिव तालुक्यातील कन्नड शाळांची पाहणी करणार आहे. त्याचवेळी ही समिती जतमध्येही प्रशासनासोबत बैठक घेणार आहे. कन्नड शाळांमध्ये मराठी शिक्षकांच्या नियुक्तीनंतर राज्य सरकार कन्नड भाषिकांवर अन्याय करतय का? असा प्रश्न निर्माण झाला असून त्याची कर्नाटक सरकारनं दखल घेतली आहे. राज्य सरकार या शिक्षक नियुक्तीची दखल घेणार का, नाही"?: विक्रम सावंत, आमदार काँग्रेस

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती : जत तालुक्यात 10 कन्नड शाळा आहेत. यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 11 मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती कन्नड शाळात करण्यात आली आहे. या प्रकरणी जतचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कन्नड शाळांमधील मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी विक्रम सावंत यांनी केली आहे. त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

भाषिक वाद पेटण्याची चिन्ह :कन्नड शाळांमध्ये कन्नड विद्यार्थ्यांना मराठीतून शिक्षक कसे शिकवतील? असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं जिल्हा परिषदेच्या गलथान कारभारामुळं कन्नड विद्यार्थ्यांचे हाल होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जत तालुक्यात कर्नाटक सीमेवर 132 राज्य सरकारी कन्नड शाळा आहेत. मात्र, यातील 10 शाळांमध्ये 11 मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्यानं भाषिक वाद पेटण्याची चिन्ह आहेत.


'हे' वाचलंत का :

  1. "नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे 'सरदार'"; अटल सेतू कामाच्या दर्जावरुन नाना पटोलेंची टीका, सेतूची केली पाहणी - Nana Patole on Atal Setu
  2. 'नीट'नंतर आता सीईटी परीक्षेत मोठा गोंधळ, पेपरमध्ये ५४ चुका; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा - Aaditya Thackeray On CET Paper
  3. लोकसभेतील पराभवानंतरही पंकजा मुंडेंना मिळणार मोठी जबाबदारी; देवेंद्र फडणवीसांची खेळी? - Pankaja Munde Rajya Sabha

ABOUT THE AUTHOR

...view details