महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूजा खेडकर यांच्या बंगल्यात अज्ञात व्यक्तींचा शिरकाव; संशयास्पद हालचाली - Pooja Khedkar Case

Pooja Khedkar Case : विवादित आयएएस अधिकारी पूजा खेडकर या आज (20 जुलै) पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांच्या बाणेर येथील घरात काही अनोळखी इसमांनी प्रवेश करून काही साहित्य सोबत नेले. याविषयी घटनास्थळी उपस्थित त्यांचे नातेवाईक बाळासाहेब खेडकर यांना विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तर देण्यास टाळले.

Pooja Khedkar Case
पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर सामान नेताना कर्मचारी (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 6:20 PM IST

पुणे Pooja Khedkar Case :वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर पुण्यात दाखल झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय. पूजा खेडकर यांच्या बाणेर मधील घराबाहेर हालचाली दिसतायत. बंगल्यात काही वाहनातून दाखल झालेल्या व्यक्तींची गेट बंद करून दाराआड चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, पूजा खेडकर यांच्या बाणेर येथील बंगल्यात पाच ते सहा अनोळखी इसमांनी प्रवेश करून काही वस्तू नेल्याचे निदर्शनास आले आहे.

पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर सुरू असलेल्या हालचालींविषयी माहिती देताना त्यांचा सहकारी (ETV Bharat Reporter)

म्हणे 'ती' गावातील माणसे होती :पूजा खेडकर यांच्या बंगल्यात सकाळी नऊच्या सुमारास ते आत गेले होते. ते एक वाजता बाहेर पडले आहेत. जाताना सर्व इसमांनी आपले तोंड रुमालाने बांधून लपवत स्विफ्ट डिझायर या गाडीत बसून निघून जाताना दिसून आले आहेत. सर्व हालचाली या संशयास्पद असल्यानं मोठा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान बंगल्याच्या गेटची चावी बाळासाहेब खेडकर या नातेवाईकाकडे असल्यानं त्यांना प्रत्यक्षरित्या विचारले असता आमच्या गावाकडील माणसे होती. मला माहीत नाहीत का आले होते ते? माझ्याकडे फक्त मेन गेटची चावी आहे. पूजा खेडकर यांच्याशी माझा कसलाच संवाद झाला नाही आणि मला कसल्याही प्रकारे अद्याप माहिती नाही, असं बोलून उडवाउडवीची उत्तरे देत बाळासाहेब खेडकर यांनी टाळाटाळ केली आहे.


संशयास्पद हालचालींमुळे अनेक प्रश्न उपस्थित :बाहेर मेन गेट बंद केलं असून आतील दरवाजा अद्याप उघडाच असल्यानं बंगल्यात आणखी लोकं असल्याचं दिसून येत आहे. पूजा खेडकरांच्या घरातून अज्ञात व्यक्तींकडून वस्तू नेण्याचा सपाटा चालूच आहे. खेडकर यांच्या बंगल्यातून एका तरुणाने लेडीज पर्स, पर्समध्ये मोबाईल आणि इतर वस्तू असल्याची शक्यता आहे. खेडकर यांच्या बंगल्यातून जाणाऱ्या व्यक्तीच्या संशयास्पद हालचालीमुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. अज्ञात व्यक्ती पुणे पोलिसांना न विचारता बंगल्यात कशा घुसल्या? तर काही पुरावे नष्ट करतायत का? असे अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत.


सुनावणीनंतर पूजा खेडकर कारने पुण्याकडे रवाना :पूजा खेडकर यांचा मुक्काम वाशिम येथील शासकीय विश्रामगृहात होता. शुक्रवारी १९ जुलैला सकाळी ९ वाजता त्यांना भेटण्यासाठी वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीदेवी पाटील विश्रामगृहात गेल्या होत्या. यापूर्वीही पूजा खेडकर यांना एपीआय पाटील यांनीच पुणे पोलिसांची नोटीस बजावली होती. गुरुवारी पुणे पोलिसांनी खेडकर यांना पुणे येथे हजर राहण्यासाठी सांगितले होते; मात्र पूजा खेडकर शुक्रवारी दुपारपर्यंत वाशिम येथील विश्रामगृहातच होत्या. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकर यांना शनिवारी पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे त्या शुक्रवारी दुपारी ४ वाजता कारने पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली होती.

हेही वाचा :

  1. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल - Pooja Khedkar
  2. पूजा खेडकर प्रकरणात मोठी घडामोड : यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा - Manoj Soni Resigns
  3. पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ; मनोरमा खेडकर यांच्या कंपनीला महानगरपालिकेनं ठोकलं टाळं, काय आहे प्रकरण? - IAS Pooja Khedkar

ABOUT THE AUTHOR

...view details