महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला" : NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी, पेपरफुटी विरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन - Chikhal Pheko Aandolan - CHIKHAL PHEKO AANDOLAN

Chikhal Pheko Aandolan : NEET परीक्षेतील हेराफेरीविरोधात वैद्यकीय विद्यार्थ्यांसह काँग्रेस कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहेत. आज राज्यभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाई, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था तसंच NEET पेपरफुटी विरोधात चिखल फेको आंदोलन आणि निदर्शनं केली.

Nana Patole, MP Varsha Gaikwad
नाना पटोले, वर्षा गायकवाड (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 7:44 PM IST

मुंबईChikhal Pheko Aandolan : महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था तसंच NEET पेपरफुटी विरोधात आज काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं. त्यानंतर टिळक भवनातील पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारवर जोरदार निशाना साधला. राज्यातील भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.

वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

"केंद्रासह राज्यातील भाजपा सरकार जनतेला वेठीस धरून त्यांची चेष्टा करत आहे. राज्यात कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे मोडीत निघाली आहे; महागाई, बेरोजगारीमुळं लोकांचं जगणं कठीण झालं आहे. सरकार बियाणे, खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची लूट करत आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भ्रष्ट महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं आज राज्यभर चिखलफेक आंदोलन करण्यात आलं" - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला :टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, "राज्यातील भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. डीबीटी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कीटकनाशके, फवारणी पंप, खते, औषधे दिली जातात, मात्र 2 हजार 700 रुपयांवरून फवारणी पंपाची किंमत 4 हजार 500 रुपये करण्यात आली. याकडं कृषी आयुक्तांनी लक्ष वेधलं तर कृषी आयुक्तांची बदली करण्यात आली. या योजनेचा 11 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला असता. परंतु भाजपा सरकारनं भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली."

NEET परीक्षाच रद्द करण्याची मागणी :केंद्र सरकारनं काही पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. परंतु महागाईच्या तुलनेत ही वाढ फारच तुटपुंजी आहे. महागाईच्या दरानुसार ही MSP वाढ नाही. डिझेल, खते, बी-बियाणे, कृषी साहित्याचे वाढलेले भाव पाहून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरलं नाही. राज्यात भीषण दुष्काळ आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काँग्रेसनं शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय. भाजपाच्या राज्यात सातत्यानं पेपर फुटण्याच्या घटना घडत आहेत. पेपरफुटीमुळं NEET परीक्षाच रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतल्यावर केंद्र सरकार खडबडून जागं झालंय. आजच्या आंदोलनात काँग्रेसनंही NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच, राज्यात पाऊस पडत असताना भाजपा सरकार पोलीस भरती सुरू ठेवून उमेदवारांच्या भवितव्याशी खेळत आहे. ही भरती पुढं ढकलण्याची मागणी करूनही सरकार त्याकडं लक्ष देत नसल्याचंही नाना पटोले म्हणाले.

भाजपा उमेदवारांचाही EVM वर आक्षेप : "लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही, त्यामुळं बॅलेट पेपरवरच मतदान व्हावं, अशी मागणी देशभरातून होत आहे. मात्र, भाजपा सरकार केवळ ईव्हीएमवरच निवडणुका घेत आहे. विरोधी पक्षांचाही ईव्हीएमवर आक्षेप आहे, पण आता भाजपाच्या उमेदवारांचाही ईव्हीएमवर विश्वास राहिलेला नाही. भाजपाच्या तीन उमेदवारांसह देशभरातील आठ उमेदवारांनी ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला आहे. भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांनीही त्यावर आक्षेप घेतला आहे. आता तरी निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं", असंही नाना पटोले म्हणाले.

शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :मुंबई काँग्रेसच्या वतीनं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानातील राजीव गांधी भवनात केंद्र सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली. माजी मंत्री अस्लम शेख, तसंच मुंबई काँग्रेसचे युवक अध्यक्ष तसंच असंख्य कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसकडून असंच आंदोलन सुरू राहणार आहे.

'हे' वाचलंत का :

  1. 'नीट'नंतर आता सीईटी परीक्षेत मोठा गोंधळ, पेपरमध्ये ५४ चुका; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा - Aaditya Thackeray On CET Paper
  2. लोकसभेतील पराभवानंतरही पंकजा मुंडेंना मिळणार मोठी जबाबदारी; देवेंद्र फडणवीसांची खेळी? - Pankaja Munde Rajya Sabha
  3. सायबर गुन्हेगारांनो सावधान! क्लिष्ट सायबर गुन्ह्यांची चुटकीत होणार उकल, पोलीस करणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details