अमरावती : मेळघाटात अंजनगाव वनपरिक्षेत्रातील परिसरात मंगळवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी एका वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मृत वाघाचा शोध घेण्यासाठी वन अधिकारी आणि कर्मचारी जंगलात गेले आहेत.
वाघाच्या मृत्यूची गोपनीय माहिती :मेळघाट प्रादेशिक वन विभाग अमरावती अंतर्गत अंजनगाव वनपरिक्षेत्रातील पांढरा खडक वर्तुळ अंतर्गत असलेल्या ढोरबा बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक 1032 मध्ये एका वाघाचा मृत्यू झाला असल्याची गोपनीय माहिती वन अधिकार्यांना मिळाली. वाघाच्या मृत्यूची माहिती मिळताच, रात्री अंधारात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मृत वाघाचा शोध घेण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती आहे.
वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण अस्पष्ट :"पांढरा खडक वर्तुळ अंतर्गत येणाऱ्या घनदाट जंगलात वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. जंगलात केवळ एका वाघाचा मृत्यू झाला, एवढीच माहिती सध्या समोर आली आहे. वाघाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती प्राप्त होताच वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पथक जंगलात पाठवण्यात आले असून वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण सत्यता पडताळणी नंतरच समोर येईल," असं मेळघाट प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक अग्रीम सैनी यांनी यांनी सांगितलं.
हेही वाचा
- बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणार 25 लाखांची मदत; जाणून घ्या नियम व अटी
- 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष, आजची स्थिती काय?
- मुंबईतील करोडपती निघाले कर बुडवे; प्रॉपर्टी टॅक्स न भरणाऱ्या 3605 मालमत्तांवर पालिकेची कारवाई