महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना दिलासा, उच्च न्यायालयाकडून सहा आरोपींना जामीन - COMRADE GOVIND PANSARE

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 6 आरोपींना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. यानंतर वकिलांच्या सल्ल्यानुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेऊ असं मेघा पानसरेंनी सांगितलं.

कॉम्रेड गोविंद पानसरे
COMRADE GOVIND PANSARE (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2025, 7:54 PM IST

Updated : Jan 29, 2025, 10:28 PM IST

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 6 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. फेब्रुवारी 2015 साली मॉर्निंग वॉक करत असताना त्यांची राहत्या घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सामाजिक कार्यकर्त्या आणि गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी आम्ही जामीन देण्याच्या विरोधात भूमिका मांडली होती. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या निकालाचा स्वीकार केला असून, आमच्या वकिलांच्या सल्ल्यानुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेऊ असं मत मेघा पानसरे यांनी व्यक्त केलं.

उच्च न्यायालयाचा निकाल हातात आल्यावर निर्णय घेऊ :पानसरे खटल्यातील सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, भरत कुरणे, वासुदेव सूर्यवंशी, अमित बद्दी यांना आज उच्च न्यायालयानं जामीन दिला. तर या खटल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाची प्रत हातात आल्यानंतर वरिष्ठांशी बोलून याबाबतचा निर्णय घेऊ असं सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलांशी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून या खटल्यातील कच्चे दुवे काय आहेत. याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ. आरोपींच्या वकिलांनी या खटल्यामधील आरोपींचा तुरुंगातील कालावधी जास्त असल्याचं कारण दिलं आहे. मात्र, याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश हातात आल्यानंतरच निर्णय घेता येईल असं वकील शिवाजीराव राणे म्हणाले.

माध्यमांशी बोलताना मेघा पानसरे (ETV Bharat Reporter)

कारस्थान केल्याची थिअरी उच्च न्यायालयानं फेटाळली : आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या खटल्याबाबत बोलताना सुरुवातीपासूनच या खटल्यामध्ये कारस्थान असल्याचा उल्लेख वारंवार झाला. मात्र या खटल्यातील सहा आरोपींचा जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयानं कारस्थान रचल्याची थिअरी मोडीत काढली आहे. या खटल्यातील आणखी एक आरोपी वीरेंद्र तावडे यालाही जामीन मिळेल असा आशावाद आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केला.

पानसरे कुटुंबीय सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार :मुंबई उच्च न्यायालयानं पानसरे खटल्याची सुनावणी डे टू डे घेण्याची सूचना केली होती. मात्र, आता या खटल्यातील सहा आरोपींना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात जामीन अर्ज फेटाळावा यासाठी वरिष्ठ वकिलांशी चर्चा करून आपण सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.


हेही वाचा :

  1. गोविंद पानसरे हत्या प्रकरण: तपासावर आता मुंबई उच्च न्यायालयाकडून देखरेख नाही, कुटुंबीयांची याचिका निकाली
  2. मुख्यमंत्र्यांनी 'हो' किंवा 'नाही' सांगावे, जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा, मराठा आंदोलकांचा रस्ता रोको
  3. ...म्हणून, प्रयागला त्रिवेणी संगमावर तर, नाशिकला रामकुंड इथं भविकांची स्नानासाठी गर्दी
Last Updated : Jan 29, 2025, 10:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details