ठाणे CM Shinde Helped Injured:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दौऱ्यानिमित्त नेहमी प्रवास करत असतात. या प्रवासा दरम्यान रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत करताना अनेकदा पाहायला मिळालेले आहे. आज पुन्हा एकदा याच गोष्टीचा प्रत्यय कळवा पुलावर पाहायला मिळाला. (Thane Kalwa Bridge Accident ) पुलावर अपघात झाल्यावर लागलीच उतरून अपघातग्रस्तांना आपल्या वाहनातून मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात दाखल केले. या त्यांच्या कृतीमुळे मुख्यमंत्र्यांचा दयाळू स्वभाव पाहायला मिळाला आहे. (CM Shinde Helped Injured)
'त्या' जखमींवर शासकीय खर्चातून उपचार : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकात ओवरब्रिज कोसळून 27 नोव्हेंबर, 2022 रोजी मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये निलिमा रंगारी नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. तर 2 प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून मृत महिलेच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. शिवाय जखमींवर शासकीय खर्चातून वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश दिले गेले.
रोहित पवारांची जखमींना मदत : सामान्य माणूस अपघातग्रस्त होवो वा तो दु:खात असताना नेतेमंडळींना त्याचं सोयरंसुतक नसतं असं म्हटलं जातं. मात्र हे चुकीचं आहे. याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यात 19 नोव्हेंबर, 2020 रोजी झालेल्या एका अपघातात आला. ज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अपघातातील जखमींना मदत केली. जमिनीवर पाय असलेला लोकप्रतिनिधी म्हणून जामखेडचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्राला ओळख आहे. रस्त्यात जाताना खटाव-माण तालुक्याच्या हद्दीवर अपघातग्रस्तांना त्यांनी केलेली मदत आणि दिलेला वेळ त्यांचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. त्यांच्या या मदतीच्या वृत्तीमुळे उपस्थितांमधून कौतुक झाले.