महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत 'भाकरी' फिरणार; सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विश्वास - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Baramati Lok Sabha Constituency : पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज (18 एप्रिल) रोजी अर्ज भरला. या निमित्तानं घेण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस सुनेत्रा पवारचं जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Baramati Lok Sabha Constituency
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 7:47 PM IST

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सुनेत्रा पवारांच्या विजयाची हमी देताना

पुणे Baramati Lok Sabha Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस भाकरी फिरवणार आहे आणि बारामतीमध्ये महायुतीचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज आज (18 एप्रिल) भरण्यात आला. त्यापूर्वी भव्य शक्ती प्रदर्शन महायुतीकडून करण्यात आलं असून जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

ही लढाई परिवारवाद विरुद्ध विकास अशीच :बारामतीकरांनी पंधरा वर्षे निवडून दिलं; परंतु विकास झाला नाही. त्यामुळे बारामतीमध्ये आता भाकरी फिरणार आहे आणि भाकरी तुम्ही फिरवणार आहात आणि मोदींचे सरकार येणार आहे. ही लढाई परिवारवाद विरुद्ध विकास यावरची आहे, असेसुद्धा मुख्यमंत्री म्हणाले आहेत. ज्यांना सून आणि लेक या मधल्या अंतराचे मनातले मांडे खायचे ते त्यांना खाऊ द्या. "जे खातील मांडे त्यांना मिळतील धोंडे." त्यामुळे "अबकी बार सुनेत्रा पवार" अशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी दिली असून शरद पवारांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं निवडणुकीचं महत्त्व :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जरी असं म्हणत असले की, मी शरद पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आलो आणि शिकलो. मात्र त्यांनी बोट सोडल्यानंतरच ते देशाचे पंतप्रधान झाले आणि विकसित भारत तयार करण्यासाठी विकास पुरुष झाले. तसेच आता अजित पवार यांनी शरद पवारांचे बोट सोडलेलं आहे. त्यामुळे यापुढे विकास आणि भारत जगभरात विकसित राष्ट्र म्हणून उदयास यावे, यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. यात आपला विजय होईल अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

व्यासपीठावर 'या' नेत्यांची उपस्थिती :या जाहीर सभेमध्ये व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, बारामती जिल्ह्यातील सर्व भाजपा नेते आजी-माजी आमदार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसले. आज महायुतीकडून फक्त सुनेत्रा पवार यांचाच अर्ज भरण्यात आलेला आहे. दोन दिवसानंतर पुणे आणि मावळचासुद्धा अर्ज महायुतीकडून भरण्यात येणार आहे.

चारशे पारमध्ये बारामती असणार :शरद पवारांच्या आतले पवार आणि बाहेरचे पवार या वक्तव्यानंतर आज (18 एप्रिल) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला. बारामतीच्या मनामनातील सून असा सुनेत्रा पवार यांचा उल्लेख आपल्या भाषणात केलेला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा आज उमेदवारी अर्ज पुण्यात भरण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी असा उल्लेख केलेला आहे. या सभेमध्ये जिथपर्यंत माझी नजर जात आहे तिथपर्यंत लोकचं लोकं दिसत आहेत. बारामतीचा फैसला आजच झालेला असून चारशे पारमध्ये बारामती असणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या व्यासपीठावरच एवढे लोक नेते आहेत की त्यांचेच मतदान 15 लाख हजार पर्यंत जाईल आणि आपला विजय होईल, असंसुद्धा ते म्हणाले आहेत.

ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये विकास केली आणि माणसे जोडली. आज जे विकासाचं चित्र दाखवलं जातं त्यात मोलाचा वाटा अजित पवार यांचा आहे. हे कुणीच नाकारू शकता नाही. ही लढाई अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी नाही. सुनेत्राताई विरुद्ध सुप्रियाताई अशीही नाही. लोकसभेची निवडणूक आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. कुणाच्या हातात भारत देश द्यायचा याचा विचार करणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीने पवार साहेब किंवा सुप्रिया सुळे हे नेते बनणार नाहीत. अजित पवार उपमुख्यमंत्र्यांचे काही केंद्रात जाणार नाही. या निवडणुकीत एवढेच पाहिजे की बारामतीचा खासदार हा मोदींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधीच्या बाजूने उभा राहतो. विकासाला मत द्यायचं का विनाशाला मत द्यायचं हा निर्णय बारामतीने करायचा आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी भाषण करताना म्हणाले आहेत.

हेही वाचा :

  1. कराड विमानतळावर प्रशिक्षण ॲकॅडमीचं विमान कोसळलं; प्रशिक्षणार्थी जखमी, मोठी दुर्घटना टळली - Karad Airport
  2. भाजपाची 13वी यादी जाहीर; रत्नागिरीत नारायण राणे यांना उमेदवारी, विनायक राऊतांशी रंगणार सामना - Lok Sabha Election 2024
  3. पर्यावरण रक्षणासाठी लोकसभा निवडणूक लढणारा कोल्हापूरचा अवलिया संदीप संकपाळ, सायकलवरून येत दाखल केला अर्ज - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details