महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"नकली वाघांना असली वाघनखाचं..."; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - Shivaji Maharaj Waghnakh at Satara - SHIVAJI MAHARAJ WAGHNAKH AT SATARA

Shivaji Maharaj Waghnakh : लंडनच्या म्युझियममधून भारतात आणण्यात आलेल्या वाघनखाचं आज साताऱ्यात अनावरण झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.

Shivaji Maharaj Waghnakh
सातारा येथे वाघनखांचं अनावरण (Source : ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 6:37 PM IST

सातारा Shivaji Maharaj Waghnakh : लंडनच्या म्युझियममधून भारतात आणण्यात आलेल्या वाघनखाचं आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात अनावरण झालं. वाघनखं खरी की खोटी, असा संशय व्यक्त करणाऱ्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोला लगावला. 'नकली वाघांना असली वाघनखाचं महत्त्व कसं कळणार', असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला (Source : ETV Bharat Reporter)

ऐतिहासिक वाघनखाचं शाही थाटात अनावरण : या वाघनखांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत शाही थाटात अनावरण झालं. छत्रपतींच्या वधाचा विडा उचलेल्या अफजलखानाचा महाराजांनी वध केला. तो दिवस र्शार्य दिन म्हणून साजरा केला जातो. वाघनखं ही छत्रपतींच्या शौर्याचं प्रतिक आहेत, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

विरोध करणाऱ्यांची नियत आणि बुध्दीही नकली : साताऱ्यात आणण्यात आलेली वाघनखं खरी नसल्याची शंका विरोधकांनी उपस्थित केली आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर टीका केली. वाघनखं खरी नसल्याचं म्हणणाऱ्या विरोधकांची नियत आणि बुध्दीही नकली असल्याचं टीकास्त्र फडणवीसांनी विरोधकांवर सोडलं. दरम्यान, 'तुम्ही नकली वाघांसोबत आहात, असली वाघांसोबत या', अशी ऑफर विधीमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली होती.

संसद भवनात शिवसृष्टीचा प्रस्ताव : आजचा दिवस हा शिवप्रेमींसाठी गौरवाचा दिवस असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. आतापर्यंत अफजलखानाचं उदात्तीकरण होत होतं. मात्र, महायुती सरकारनं अफजाखानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं. तसंच छत्रपतींचा राज्याभिषेक दिन सोहळा हा सरकारी कार्यक्रम करण्यात आला. संसद भवनात शिवसृष्टी तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचंही मुनगंटीवारांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं साताऱ्यात दाखल, शिवप्रेमींसाठी शनिवारपासून प्रदर्शन खुले - Shivaji Maharaj Tiger Claw
  2. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांवरुन रणकंदन; सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांना सुनावलं, वाघनखं महाराजांचीच असल्याचा दावा - Monsoon Assembly Session 2024
  3. वाघनखांचा वाद: छत्रपती शिवरायांच्या वाघनखांबाबत संशय व्यक्त करणं चुकीचं - सुधीर मुनगंटीवार - Sudhir Mungantiwar On Waghnakh

ABOUT THE AUTHOR

...view details