मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका अहमदनगरSujay Vikhe Election Assembly : महाविकास आघाडीच्या रावण रूपी असलेल्या लंकेचे दहन करून सुजय विखे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. कारण ड्रामा करून कोणी निवडून येत नाही. त्यासाठी कामच करावं लागतं जे की, सुजय विखे यांनी केलेले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार असलेल्या सुजय विखे यांना अहमदनगर येथील सभेत पाठबळ दिले. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले निलेश लंके यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
राहुल गांधी विदेशात थंड हवा खाण्यासाठी गेले :पंतप्रधान नरेंद्र मोदी उन्हातान्हाची परवा न करता देशात फिरत आहे. दुसरीकडे राहुलबाबा थोडे गरम झाल्यावर विदेशात थंडगार हवा खाण्यासाठी जातायत आणि आपल्या देशाची बदनामी करतात, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर केलीय. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज आज (22 एप्रिल) दाखल करण्यात आलाय. या निमित्ताने राहाता येथील वीरभद्र मंदिरासमोर जाहीर प्रचार सभेदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणातून राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलय :छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेऊन सांगितले होते की, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं. हे आरक्षण रद्द करण्यासाठी अनेक लोक न्यायालयात गेले; मात्र न्यायालयाने ते रद्द केले नाही. 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला लागू झालयं. काही लोकांनी संधी असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, समाजाचा वापर फक्त राजकारणासाठी केला असल्याची टीका यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.
ड्रामा करून निवडणुका जिंकता येत नाही :नगर दक्षिण मधून महायुतीचे उमेदवार असलेले भाजपाचे सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आज (22 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी नगर शहरातील दिल्ली गेट परिसरामध्ये विखे यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले निलेश लंके यांच्या वरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या रावण रूपी असलेल्या विरोधकांच्या लंकेचे दहन करायचे आहे. 'नो लंके, ओन्ली विखे'चा नारा देत विखेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे आहे. कारण ड्रामा करून निवडणुका जिंकता येत नाही. त्यासाठी कामच करावे लागते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी प्रतिस्पर्धी असलेले निलेश लंके यांना जोरदार टोला लगावला.
जनता मोदींनाच पंतप्रधान करणार :राहुल गांधींनी स्वप्नात देखील पंतप्रधान पदाचा विचार करू नये असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. गेली दोन टर्म लोकांनी विश्वास ठेवून पंतप्रधानपदी मोदींनाच विराजमान केले आणि तिसऱ्यांदा देखील मोदींनाच पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान करणार आहेत. कोणी स्वप्नात देखील विचार करू नये की, राहुल गांधी हे पंतप्रधान बनतील. कितीही एकत्र आले तरी मोदींच्या नाकाची सर देखील इंडिया आघाडीला नाही, अशा शब्दात यावेळी शिंदे यांनी विरोधकांना देखील सुनावलं.
राहुल गांधींवर साधला निशाना :जनतेचा विकास हा मोदी गॅरंटीवर आहे. इतर सगळ्यांच्या गॅरंटी फेल झाल्या आहेत; मात्र देशात एकच गॅरंटी चालली ती म्हणजे मोदींची गॅरंटी. देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार हा केवळ मोदींनाच असून इतर कोणीही पंतप्रधान होऊ शकत नाही, अशा शब्दात शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला. प्रचार सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नेतेमंडळी उपस्थित होते.
हेही वाचा:
- राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध; यशवंतराव चव्हाणांना 'भारतरत्न' मिळण्यासाठी करणार प्रयत्न - NCP Manifesto
- भाजपानं लोकसभा निवडणुकीत उघडलं विजयाचं खातं; '400 पार'ला 399 बाकी - Mukesh Dalal Wins
- नवनीत राणांविरोधात उद्धव ठाकरेंनी थोपाटले दंड; म्हणाले, 'बदला घेणारच' - Lok Sabha Election 2024