जालना -मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळ पर्यंत सांगून टाकावं असं अल्टिमेटम मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलंय. ते उपोषणस्थळी पत्रकारांशी बोलत होते. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला जीव जाळायला लावू नका. तुम्ही मागण्या पूर्ण करणार नसाल तर आम्ही उपोषण सोडून वेगळ्या मार्गानं आंदोलन करू. आम्हाला उपोषणाला बसावं लागेल असं वाटलं नव्हत, अशी खंतही जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिलं नाही तर आम्ही तुम्हाला 5 वर्ष सुखाने खाऊ देणार नाही असा इशाराही जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करणार आहे की नाही हे फक्त हो किंवा नाही या दोन शब्दात सांगून टाकावं. मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतो हे म्हण्याच्या आत तुम्ही आम्हाला मागण्या पूर्ण करणार आहे की नाही". - मनोज जरांगे पाटील