नाशिक :रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मनोज मोदी यांनी त्र्यंबक राज्याच्या सुवर्ण मुकुटासाठी सव्वा किलो सुवर्णदान केलं. मागील महिन्यात मनोज मोदी हे त्रंबकेश्वर इथं दर्शनासाठी आले होते. त्यावेळी तब्बल 200 वर्षांपूर्वीचा सुवर्ण मुकुट नवीन बनवण्याचा संकल्प त्यांना सांगण्यात आला. त्यानंतर त्यांनी आज त्यांचे सहकारी हितेश यांच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर संस्थांकडं सव्वा किलो सुवर्णाचे दान दिले.
आठ किलोचा सुवर्ण मुकुट बनावण्याचा संकल्प :त्र्यंबकेश्वर राजाला देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानातून साडे आठ किलोचा सुवर्ण मुकुट बनावण्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता. सदर सुवर्णदानास पाच किलो पेक्षा जास्त सोनं देवस्थानकडं जमा झालेले आहे. मनोज मोदी यांनी उरलेलं सोनं मी स्वतः देतो असं, कबूल केलं होतं. यानंतर मनोज मोदी यांनी त्यांचे सहकारी हितेश यांच्या माध्यमातून सव्वा किलो सोन्याचं दान त्र्यंबकेश्वर संस्थाकडं सुपूर्द केलं. सोन्याच्या आजच्या भावाप्रमाणं तब्बल 1 कोटींचे हे सुवर्ण दान केलं आहे. यावेळी त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, श्री मनोज थेटे, यांनी हितेश यांचा सपत्नीक सत्कार करत सदर सुवर्णदानाची पावती त्यांच्याकडे सुपूर्द केली. आतापर्यंत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये हे सर्वात मोठं दान असल्याचं सांगण्यात आलं.
त्र्यंबक राजाला 'या' भाविकानं दिलं सव्वा किलो सोनं दान (Reporter) त्र्यंबकेश्वर मंदिराचं महत्व : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. हे मंदिर नाशिक शहरापासून 28 किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र “गंगा गोदावरी” नदीचं उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वरमध्येच आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत. ज्या वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवितात. पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जाते की, ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केलं. जे पुढील काळात “ब्रह्मगिरी पर्वत” नावानं विख्यात झाले. या पर्वतावर एके काळी गौतम ऋषींचा आश्रम होता. केलेल्या अपराधातून मुक्तता मिळावी, म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केलं. गौतम ऋषींच्या तपश्चर्येवर प्रसंन्न होऊन महादेवांनी त्रिमूर्ती ज्योतिर्लिंग स्वरूप धारण केले आणि तिथेच विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभ दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा-विष्णु-महेश विद्यमान आहेत. या ज्योतिर्लिंगाची त्रिकाल पूजा केली जाते, जी स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षांपासून सुरू आहे.
मनोज मोदी यांनी त्र्यंबकश्वराला दिलं सोनं दान (Reporter) हेही वाचा :
- दानशूर तृतीयपंथी : वर्षभर पैसे मागणारे तृतीयपंथी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करतात साईबाबा चरणी रक्कम अर्पण
- शिर्डीच्या साईबाबांची श्रीमंती अपार; आणखी एक सुवर्ण मुकुट अर्पण - Shirdi Saibaba Donation
- दाक्षिणात्य अभिनेत्यांचा दानशुरपणा! चिरंजीवीसह महेश बाबूकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांची देणगी - flood relief in telangana and ap