महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोव्याहून संभाजीनगरकडे निघालेल्या बसचा कोल्हापुरात भीषण अपघात, 1 जण ठार, तर 30 हून अधिक जखमी - CHHATRAPATI SAMBHAJINAGAR ACCIDENT

गोव्यावरून पुन्हा छत्रपती संभाजीनगरकडे परतत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कांडगाव येथे बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Fatal bus accident in Kolhapur
बसचा कोल्हापुरात भीषण अपघात (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2025, 1:02 PM IST

कोल्हापूर- छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी कंपनीतील कर्मचारी सहलीसाठी गोव्याला गेले होते. मात्र गोव्यावरून पुन्हा छत्रपती संभाजीनगरकडे परतत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कांडगाव येथे बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अमोल परशुराम भिसे (वय 40, रा. चौधरी भूमी, सिडको महानगर, छत्रपती संभाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात 30 पेक्षा जास्त जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला :घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी कंपनीतील सुमारे 143 कर्मचारी 30 जानेवारी रोजी चार खासगी बसमधून सहलीसाठी गोव्याला गेले होते. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ते गोव्यावरून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने परत निघाले. यावेळी त्यांनी कणकवलीमध्ये जेवण करण्यासाठी थांबा घेतला आणि तेथून फोंडा घाट मार्गे कोल्हापूरच्या दिशेने निघाले. याचवेळी एक बस क्रमांक DD-01/T-9333 ही रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास करवीर तालुक्यातील कांडगाव येथील शेरीच्या माळजवळ असलेल्या वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक उलटली.

35 प्रवाशांपैकी एक जण जागीच ठार :अपघातात बसमध्ये असलेल्या 35 प्रवाशांपैकी एक जण जागीच ठार झालाय, तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झालेत. अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्यास सुरुवात केलीय. तसेच पोलिसांना माहिती कळवली. दरम्यान, पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून, अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आलंय. यापैकी चार जण गंभीर जखमी असून, त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले, तर काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details