महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"मराठ्यांच्या छाव्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका", आमदार राजेंद्र राऊतांचं मनोज जरांगेंना आव्हान - Rajendra Raut On Manoj Jarange - RAJENDRA RAUT ON MANOJ JARANGE

Rajendra Raut On Manoj Jarange : आमदार राजेंद्र राऊत यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज दिलंय. "मराठ्यांच्या छाव्याला आणि छत्रपतींच्या मावळ्याला डिचवण्याचा प्रयत्न केला तर काय परिणाम होतील, याची नोंद संपूर्ण महाराष्ट्र करेल," अशा शब्दात राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय.

Etv Bharat
संपादित छायाचित्र (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 2:32 PM IST

सोलापूर Rajendra Raut On Manoj Jarange : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट आवाहन केलंय. "महाविकास आघाडीकडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून हीच भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी असेल. त्यांनी लिहून दिलं नाही तर मी राजकीय संन्यास येईल," अशा शब्दात त्यांनी जरांगे पाटील यांना आव्हान दिलं.

आमदार राजेंद्र राऊत (Source - ETV Bharat)

"मनोज जरांगे-पाटील तुम्ही नेमक्या कोणाला शिव्या देता आहात? काय चाललं आहे? मराठा समाजानं तुमचा आदर केला आहे. मात्र, कशाला वाटेला जायचं म्हणून मराठ्यांचे आमदार, आजी-माजी मंत्री गप्प बसून तुमच्या शिव्या खात आहेत," अशी संतप्त प्रतिक्रिया राजेंद्र राऊत यांनी दिली.

चौकात मी फाशी घेईन :"आमचं घराणं हिंदवी स्वराज्यसाठी रक्त सांडणारं घराणं आहे. खंडोजी खोपडेच्या भूमिकेत याल तर राजा राऊत म्हणतात मला, काय परिणाम होतील याची नोंद संपूर्ण महाराष्ट्र करेल, माझं डोकं तुम्ही फिरवू नका. मी जर मराठ्यांची गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो बार्शीतील पांडे चौकात मी फाशी घेईन, प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आलात तर पेढा भरवीन पण खंडोजी खोपडेच्या भूमिकेत आलात तर मोठी शिक्षा भोगावी लागेल," असं चॅलेंज राजेंद्र राऊतांनी चॅलेंज दिलंय.

परिणामांची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल : "मराठ्यांच्या छाव्याला आणि छत्रपतींच्या मावळ्याला डिचवण्याचा प्रयत्न केला आहे. खंडोजी खोपडेच्या भूमिकेत जाल, तर राजा राऊत म्हणतात मला. होणाऱ्या परिणामांची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल. माझं डोकं फिरवू नका तुम्ही," अशा भाषेत राजा राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुनावलं.

हेही वाचा

  1. "ज्यांच्या मनातच 'शिवद्रोह' त्यांना महाराजांचा इतिहास काय कळणार", जयंत पाटील यांनी पुराव्यासह दिलं प्रत्युत्तर - Shivaji Maharaj Statue Collapse
  2. 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावानं आग्रही असलेले शरद पवार यंदा मागे का? - Face of Chief Minister
  3. महायुतीत लाडक्या बहिणीवरुन श्रेयवादाची लढाई? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय घडलं? - Ladki Bahin Yojana

ABOUT THE AUTHOR

...view details