ठाणे :भिवंडी शहरात प्रेयसीनं प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूनं वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय प्रेयसीनं 31 वर्षीय प्रियकराला सोशल माध्यमांवर कॉल करुन घरी बोलावलं होतं.
धक्कादायक: प्रियकराच्या गुप्तांगावर प्रेयसीकडून वार; प्रेयसीवर गुन्हा दखल, भिवंडी हादरली - boyfriend private parts stabbed - BOYFRIEND PRIVATE PARTS STABBED
प्रेयसीनं प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूनं वार केल्याची घटना भिवंडी शहरात घडली आहे. या प्रकरणी प्रेयसीनं स्वरक्षणासाठी बनाव करत प्रियकराच्या गुप्तांगावर वार केल्याचं म्हटलं होतं. मात्र, पोलीस तपासात प्रेयसीनंच त्याच्या गुप्तांगावर वार केल्याचं उघड झालं आहे.
Published : Aug 21, 2024, 8:54 AM IST
प्रियकराच्या गुप्तांगावर वार :प्रियकर घरी आल्यानंतरदोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू असतानाच प्रेयसीनं प्रियकराला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, प्रियकरानं लग्नास नकार देताच प्रेयसीनं भाजी कापण्याच्या चाकूनं त्याच्या गुप्तांगावर वार केले. खळबळजनक बाब म्हणजे 16 ऑगस्ट रोजी प्रेयसीनं स्वरक्षणासाठी गुप्तांगावर वार केल्याची तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी प्रियकरावरच भिवंडी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 74, 75(1)(2) सह 333 न्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलीस तपासात या घटनेला कलाटणी मिळाल्यानं प्रियकराच्या तक्रारीवरुन 19 ऑगस्ट रोजी हल्लेखोर प्रेयसीवर कलम 118 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेयसीचा बनाव उघड : या घटनेतील प्रेयसीचे प्रियकारासोबत अनेक वर्षांपासून संबंध आहेत. मात्र, त्यादिवशी प्रियकरानं माझ्या इच्छेविरुद्ध बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा बनाव प्रेयसीनं केला. त्यामुळं तिनं प्रियकराच्या गुप्तांगावर वार केल्याची तक्रार दिली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र आता पोलीस तपासात घटनेला कलाटणी मिळाली आहे. घटनेच्या वेळी प्रेयसीनंच प्रियकराच्या गुप्तांगावर वार केल्याचं निष्पन्न झालंय. त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या संदर्भात पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असून आरोपी प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.