चंद्रपूरGirlfriend Murder Case Chandrapur : प्रियकराने खून केलेलीतरुणी घटस्फोट झाल्यावर आपल्या आई-वडिलांच्या घरी आनंदवन येथे राहात होती. तिचे वडील-आई हे दोघेही दिव्यांग आहेत. आरोपी हा मूळचा जळगावचा; मात्र त्याला कुष्ठरोग असल्याने एक वर्षापूर्वी तो आनंदवन येथे उपचारासाठी आला होता. सोबत तो रुग्णालयात काम देखील करायचा. याच दरम्यान त्याची ओळख तरुणीच्या वडिलांसोबत झाली. यानंतर आरोपीचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. त्यात आरोपी आणि तरुणीचे सूत जुळले. दोघांनी लग्नाच्या आणाभाका देखील घेतल्या; मात्र यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.
ती घरी एकटीच अन् त्याने केला खून :यानंतर तरुणीचे गोंदिया येथील एका युवकाशी प्रेमसंबंध जुळले. ती आरोपीला टाळू लागली. त्यांच्यात वाद व्हायला लागले. अशातच आरोपीने तरुणीचा खून करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तीन महिन्यांपूर्वी त्याने चाकूची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. या दरम्यान तो सूड घेण्याची वाट बघत होता. बुधवारी 26 जूनला तरुणीचे आई-वडील हे उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते. ती एकटीच घरी होती. हीच संधी साधत तो तिच्या घरी गेला आणि तिचा खून केला. दुपारी तिचे वडील यांनी तिला अनेकदा फोन केले; मात्र तिचा फोन हा बंद होता. रात्री ते आले असता बाथरूममध्ये मुलगी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडून होती.
24 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या :याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपास केला; मात्र शस्त्र आढळून आले नाही. आनंदवन सारख्या ठिकाणी अशी घडलेली पहिलीच घटना होती. चौकशी केली असताना तिच्या मैत्रिणीने आरोपी तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यानुसार वरोरा पोलिसांनी आरोपीच्या हालचालीवर नजर ठेवली आणि संशय येताच लगेच त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असताना त्याने ह्या खुनाची कबुली दिली. 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली.