मुंबईIndrani Mukerjea Story :शीना बोरा खून खटल्यातील प्रमुख आरोपींपैकी इंद्राणी मुखर्जी आहे. तिच्या संदर्भात नेटफ्लिक्स या मनोरंजन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या 'इंद्राणी मुखर्जी स्टोरी'च्या वेब सिरीजला स्थगिती द्यावी, अशी मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं अशी स्थगिती देता येत नाही, म्हणत सीबीआयची याचिका फेटाळून लावली. तसेच नेटफ्लिक्सवरील 'इंद्राणी मुखर्जी स्टोरी'चा आता भागा प्रसारित होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
उच्च न्यायालयात सीबीआयचा दावा:शीना बोरा खून खटला देशभर गाजला. त्यामधील प्रमुख आरोपींपैकी एक इंद्राणी मुखर्जी हिच्यावर नेटफ्लिक्स या मनोरंजन प्लॅटफॉर्मवर 23 फेब्रुवारी 2024 रोजी 'इंद्राणी मुखर्जी स्टोरी' नावानं वेब सिरीज सुरू होणार होती. मात्र, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं नेटफ्लिक्सला आधी नोटीस जारी केली. आता हा खटला सीबीआय न्यायालयात पोहोचला. सीबीआयनं विशेष न्यायालयात त्याला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु, तिथेही स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे सीबीआयच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. त्यावेळेला सीबीआयचा युक्तिवाद आणि मागणी उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं फेटाळून लावली.
सीबीआयचा इंद्राणी स्टोरी प्रसारणाला विरोध:सीबीआयचा इंद्राणीच्या सिरीजच्या प्रदर्शनाला विरोध आहे. त्यांनी म्हटलं की, ''इंद्राणी मुखर्जीच्या वेब सिरीज प्रसारित होण्यामुळे सीबीआय विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच याला स्थगिती द्यावी. मात्र, इंद्राणी मुखर्जीचे वकील आबाद फोंडा, रणजित सांगळे यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानुसार ''सीबीआय म्हणते त्याप्रकारे त्यांच्या दाव्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. अशी स्थगिती या स्टोरीकरिता देता येणार नाही,"असा युक्तीवाद केला.
काय आहे शिना बोरा खून प्रकरण?:इंद्राणी मुखर्जीचा कारचा ड्रायव्हर राय यानं आपल्या दिलेल्या जबानीत नमूद केल्यानुसार 24 एप्रिल 2012 रोजी 24 वर्षीय शीना बोरा हिचा गळा आवळून खून करण्यात आला होता. यामध्ये खून केल्यानंतर तिचा मृतदेह ड्रायव्हर शामवर राय यानं इंद्राणी हिच्या गाडीतच टाकला. त्यानंतर रायगड येथं मृतदेह नेला. त्यावेळी इंद्राणी मुखर्जी हिचा पहिला नवरा संजीव खन्ना हादेखील त्यावेळी उपस्थित होता. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी हिला जामीन दिलेला आहे. सध्या ती जामिनावर बाहेर आहे.
हेही वाचा:
- मळके कपडे घातल्यानं शेतकऱ्याला मेट्रोत अडवलं : मानवाधिकार आयोगाची मेट्रो, सरकारला नोटीस
- काँग्रेस आमदार क्रॉस वोट प्रकरण; विधानसभा अध्यक्षांनी ६ काँग्रेस आमदारांना केलं अपात्र
- आई प्रियकरासोबत तर वडील प्रेयसीसोबत पसार; तीन महिन्यांपासून तीन मुली वाऱ्यावर