मुंबई :बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. यावेळी धमकी देणाऱ्यानं पोलीस नियंत्रण कक्षाला मेसेज करुन सलमान खानला धमकी दिली आहे. मेसेज करणाऱ्यानं तो लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा केला. सलमान खान यानं 5 कोटी द्यावे, अन्यथा त्याचा खात्मा करू, असं या मेसेजमध्ये नमूद असल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं मंगळवारी वृत्तसंस्थेला सांगितलं.
बॉलिवूडच्या भाईजानला पुन्हा धमकी :बालिवूडचा भाईजान सलमान खान याला पुन्हा एकदा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या नावानं धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ असल्याचा दावा या धमकी देणाऱ्यानं केला आहे. अभिनेता सलमान खान यानं 5 कोटी रुपये द्यावे, अन्यथा त्याला मारुन टाकू, असा मेसेज धमकी देणाऱ्यानं वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला केला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेत चौकशी सुरू आहे.
मध्यरात्री वाहतूक पोलिसांना मेसेज :मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर सलमान खानला धमकी देण्यात आली आहे. सलमान खान यानं आपल्याला 5 कोटी रुपये द्यावेत, नाहीतर त्याला मारुन टाकू असं या मेसेजमध्ये नमूद करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. मध्यरात्रीच्या सुमारास एका अधिकाऱ्यानं हा आलेला मेसेज वाचला. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यानं तत्काळ याबाबतची माहिती आपल्या वरिष्ठांना देऊन तपास सुरू केला. धमकी देणाऱ्यानं तो कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ असल्याचं त्यानं नमूद केलं, अशी माहितीही यावेळी पोलिसांनी दिली.
सलमान खानची वाढवली सुरक्षा :अभिनेता सलमान खान याला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीनं कथित धमकी दिल्याप्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सलमान खान याची सुरक्षा वाढवली आहे. सलमान खान याच्या गॅलक्सी या घराबाहरही तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- झिशान सिद्दीकी, सलमान खानला ठार करण्याची धमकी; नोएडातून एका आरोपीला ठोकल्या बेड्या
- सलमान खानला दिवाळीपूर्वी जीवे मारण्याची धमकी, यावेळी दोन कोटींची मागणी...
- बॉलिवूडच्या भाईजानची पाचावर धारण; बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानची उडाली झोप, झिशान सिद्दिकींनी दिली 'ही' माहिती