महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रात केजरीवाल भाग 2 कधीही प्रदर्शित होऊ शकतो, नितेश राणेंचा इशारा - Nitesh Rane Criticized Sanjay Raut - NITESH RANE CRITICIZED SANJAY RAUT

Nitesh Rane On Kejriwal Part 2 : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची लायकी नाही. त्यांचे कुटुंब कोविड भ्रष्टाचार आणि खिचडी चोरी प्रकरणात तुरुंगात जाऊ शकतात. महाराष्ट्रात केजरीवाल भाग 2 कधीही प्रदर्शित होऊ शकतो, असा इशारा भाजपाचे आमदार नितेश राणेंनी आज सिंधुदुर्ग येथील पत्रकार परिषदेत दिला.

Nitesh Rane On Kejriwal Part 2
नितेश राणेंचा इशारा

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 8:26 PM IST

Updated : Apr 4, 2024, 9:39 PM IST

नितेश राणे हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करताना

सिंधुदुर्गNitesh Rane On Kejriwal Part 2:व्यंकटेश उप्पर हा हेरगिरी करण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी डॉ. स्वप्ना पाटकर यांच्यावर नेमलेला माणूस होता. आठ महिन्यांची शिक्षा लागल्यानंतर जामिनावर बाहेर पडून आलेला उप्पर आता बेपत्ता झालेला आहे. सपना पाटकर यांनी या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून मनसुख हिरेन, सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रमाणे व्यंकटेश उप्पर याची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केलेला आहे. या प्रकरणात खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केला आहे. जर संजय राऊत यांचे हात खुनाने बरबटलेले नसतील तर व्यंकटेश उप्पर हा कोठे आहे याचा खुलासा करावा किंवा उद्या सकाळच्या पत्रकार परिषदेत स्वतःच्या बाजूला बसून व्यंकटेश उप्पर जिवंत असल्याचा पुरावा द्यावा, असं आव्हान भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिलं. ते कणकवलीत प्रहार भवन येथे आज (4 एप्रिल) पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्रातही केजरीवाल भाग 2 प्रदर्शित होऊ शकतो :नितेश राणे म्हणाले, "ओसाड गावचे पाटील म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे तीन तेरा वाजवणारा भांडुपचा देवानंद संजय राऊत आहे. त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची लायकी नाही. त्यांचे कुटुंब आणि मालक कोविड भ्रष्टाचार आणि खिचडी चोरी प्रकरणात कधीही जेलमध्ये जाऊ शकतात. महाराष्ट्रात केजरीवाल भाग 2 कधीही प्रदर्शित होऊ शकतो, असा इशारा दिला. मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप मागील 10 वर्षांत ते करू शकले नाहीत; मात्र यांनी कोरोनात भ्रष्टाचार केला. खिचडी खाल्ली, खुनानी त्यांचे हात बरबटलेले आहेत."

तर खुल्या व्यासपीठावर चर्चेला या :नारायण राणेंनी सिंधुदुर्गमध्ये काय दिलं ह्याचा हिशोब हवा असेल तर एका खुल्या व्यासपीठावर या. किती विकास कामं अडविण्याचं काम ह्या विनायक राऊत यांनी केलं आहे, त्याची चर्चा करू असं आव्हान नितेश राणेंनी दिलं आहे. या विनायक राऊतांच्या बैठकांना सात लोकसुद्धा नसतात अशी टीकाही राणेंनी केली.

गांधी, ठाकरे दुसऱ्यांच्या पैशावर जगतात :राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे कुटुंब दुसऱ्यांच्या पैशांवर जगणारे कुटुंब आहे. ते कोणाच्या पैशाने फिरतात? त्यांच्या नावे गाड्या, बंगले, विमाने कशी येतात. अशांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेण्याची लायकी नाही. वैभव नाईक यांनी राणेंचं नाव घेतलं नाही तर मातोश्रीचा पगार मिळणार नाही. कुडाळमध्ये मिळणाऱ्या लीडमुळे वैभव नाईक यांना उत्तर मिळेल. तर संजय राऊतांनी उदय सामंतच्या भावाची चिंता करण्यापेक्षा त्यांचा भाऊ नंदनवनमध्ये म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर किती वेळ असतो हे बघावं. तुमच्या सारखे खुनी, बलात्कारी गॅंगरेपचे आरोप असणाऱ्यांनी भाजपावर बोलू नये, असे उत्तर आदित्य ठाकरे यांना आमदार नितेश राणे यांनी दिले.

हेही वाचा :

  1. "मी रविंद्र धंगेकरांचं दिल्लीला जायचं तिकीट बुक करून ठेवलंय"- सुप्रिया सुळे - SUPRIYA SULE pune news
  2. रश्मी बर्वे यांना निवडणूक लढविता येणार नाही, जात वैधता प्रमाणपत्रावर नागपूर खंडपीठाची अंतरिम स्थगिती - Lok Sabha Election 2024
  3. भाजपानं आयात केलेले भ्रष्ट नेते लोकसभा निवडणुकीत मोदींची वाट लावणार, संजय राऊतांची जहरी टीका - Lok Sabha Election 2024
Last Updated : Apr 4, 2024, 9:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details