महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आक्षेपार्ह विधान आणि हावभाव करणं पडलं महागात, नितेश राणेंवर गुन्हा दाखल - BJP MLA Nitesh Rane - BJP MLA NITESH RANE

BJP MLA Nitesh Rane : अहमदनगर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधातील मोर्चादरम्यान मशिदीच्या दिशेनं बोटांच्या साहाय्यान आक्षेपार्ह इशारा करणं आ. नितेश राणे यांना भोवलं आहे. त्यांच्या विरोधात नगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP MLA Nitesh Rane
नितेश राणे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 4:51 PM IST

Updated : Sep 2, 2024, 5:46 PM IST

अहमदनगर BJP MLA Nitesh Rane :अहमदनगर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधातील मोर्चादरम्यान भाजपा नेते नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसंच त्यांनी आक्षेपार्ह हावभाव केल्याप्रकरणी अहमदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल :मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचल्यानंतर नितेश राणे यांनी मशिदीच्या दिशेनं बोटांच्या साहाय्यानं आक्षेपार्ह इशारा केला, तसंच इतर धर्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी नितेश राणेंसह सागर बेग, आकाश बेग आणि संघपाळ अशा चौघांवर भारतीय न्याय संहिता कलम 353 (2), 351(1), 352, आणि 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दोन ठिकाणी गुन्हे दाखल :नितेश राणेंविरोधात एक नव्हे तर दोन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिलं प्रकरण श्रीरामपूर तर दुसरं तोफखाना पोलीस ठाण्यात नोंदवलं गेलं. नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला उघडपणं धमकी दिली, असं तक्रारदाराने म्हटलंय. "रामगिरी महाराजांना विरोध केला, तर मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू," असं विधान नितेश राणेंनी केलं होतं. नितेश राणे हे अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

धार्मिक हिंसा पसरवण्याचा प्रयत्न :श्रीरामपुर येथे रामगीरी महाराजांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जेसीबवर बसुन नितेश राणे सहभागी झाले. या जाहीर सभेत नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी केलेलं विधान सोशल मीडियावर व्हायरल झालंय. एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी व्हिडीओ शेअर करुन नितेश राणे धार्मिक हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

हेही वाचा

  1. विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाचाच वरचष्मा? मुख्यमंत्रीपदावरही दावा - Assembly elections
  2. "फडणवीस यांना इतिहास समजलेला नाही, ते औरंगजेब फॅन क्लबचे..."- संजय राऊतांची खोचक टीका - Surat loot remark
  3. पुण्यात पुन्हा गँगवॉर; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या, 3 जणांची चौकशी सुरू - Vanraj Andekar Firing
Last Updated : Sep 2, 2024, 5:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details