महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उल्हासनगरमध्ये भाजपा आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; प्रकृती चिंताजनक, आमदार अटकेत

BJP MLA Ganpat Gaikwad Firing : भाजपा आमदारानं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री उशिरा घडली. या घटनेत शिंदे गटाचे नेते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

BJP MLA Firing
BJP MLA Firing

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 6:28 AM IST

Updated : Feb 3, 2024, 1:50 PM IST

उल्हासनगर BJP MLA Ganpat Gaikwad Firing : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेले महेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शरिरातून तब्बल 6 गोळ्या काढण्यात आल्या आहेत.

आमदारांसह तिघांना अटक : उल्हासनगरमधील 'हिल लाईन' पोलीस ठाण्यात ही घटना घडली. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली आहे.

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड (शिवसेना शिंदे गटाचे नेते) आणि राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. इथे जे सापडलं, त्यावरून स्वसंरक्षणासाठी गोळीबार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. येथे कुठलाही वाद नव्हता. मात्र गणपत गायकवाड यांनी त्यांना (महेश गायकवाड) लक्ष्य करून गोळ्या झाडल्या. जखमी महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या आहेत." - ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे

महेश गायकवाड गंभीर जखमी :प्राथमिक माहितीनुसार, हिल लाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात चर्चा सुरू होती. दरम्यान, याचवेळी गणपत गायकवाड समर्थक आणि महेश गायकवाड समर्थक यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं. त्याचवेळी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले.

दोघांमध्ये बाचाबाची झाली :"महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात काही गोष्टीवरून मतभेद झाले. ते दोघेही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली आणि गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला. यात दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी तपास सुरू आहे", असं डीसीपी सुधाकर पठारे यांनी सांगितलं.

पूर्ववैमनस्यातून घडली घटना : कल्याण पूर्व विधानसभेच्या उमेदवारीवरून गेल्या वर्षभरापासून दोन्ही गायकवाडांमध्ये खडाजंगी सुरू आहे. दोघंही एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. गोळीबाराची ही घटना दोघांमधील पूर्ववैमनस्यातून घडली असल्याची शक्यता आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे वाचलंत का :

  1. प्रेम प्रकरणात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनं केला खून; अमरावतीत नेमकं काय घडलं?
Last Updated : Feb 3, 2024, 1:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details