महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तोंडाला कापड बांधून दुचाकीसह ट्रक पेटवला, आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Bike Burning In Nashik - BIKE BURNING IN NASHIK

Bike Burning In Nashik : नाशिकच्या जुने नाशिक परिसरात उभ्या असलेल्या 7 ते 8 दुचाकी आणि एक ट्रक पेटवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 15 मे रोजी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तोंड बांधून गाड्यांची जाळपोळ केली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Bike Burning Case
दुचाकींना लावली आग (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 6:29 PM IST

Updated : May 16, 2024, 8:00 PM IST

दुचाकी जाळणारे सीसीटीव्हीत कैद, घटनेविषयी सांगताना स्थानिक नागरिक (Reporter)

नाशिकBike Burning In Nashik: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गाड्यांच्या जाळपोळीची घटना घडल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाला एक प्रकारे गुन्हेगारांनी आव्हान दिलं आहे. जाळपोळ प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरात सातत्याने वाहने जाळपोळीच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारांना जेरबंद करून कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद :15 मे रोजीच्या मध्यरात्री एका दुचाकीवरून तीन संशयित युवक जुने नाशिक परिसरात आले. त्यातील एकाने परिसरात उभ्या असलेल्या चार ते पाच दुचाकीवर पेट्रोल ओतलं आणि दुसऱ्याने आग लावत तेथून फरार झाले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्यानं बाजूला पार्क केलेल्या दुचाकीसुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. दरम्यान गाड्या जाळपोळीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. भद्रकाली पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.


लवकरच आरोपींना जेरबंद करू :जुने नाशिक परिसरामध्ये वाहनांची जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे. यात आम्हाला सीसीटीव्हीमध्ये अज्ञात संशयित दिसून आले असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. लवकरच आरोपींना आम्ही ताब्यात घेऊ. तसंच या भागात पोलीस गस्त वाढवली जाईल, असं भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सांगितलं.

पोलीस वेळेवर आले नाहीत :आमच्या डोळ्यासमोर आमच्या दुचाकी पेटत होत्या. याची कल्पना आम्ही पोलीस आणि फायर ब्रिगेडला दिली; मात्र ते वेळेवर आले नाहीत. स्थानिक तरुणांनी मिळून पाण्याने आग विझवली. सहा जणांच्या टोळीनं दहशत निर्माण करण्यासाठी दुचाकी पेटवून दिल्या आहेत. यात आमचं मोठं नुकसान झाले आहे. पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

  1. कोल्हापूरच्या अनेक गावात सव्वाशे वर्ष सुरू आहे 'ही' प्रथा, गावागावात का ओढला जातो 'मरीआईचा गाडा' - Kolhapur Village Tradition
  2. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल ; चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केला विश्वास, महालक्ष्मी मंदिरात घेतले आशीर्वाद - Chandrababu Naidu On NDA Gov
  3. मोदींच्या रोडशोमुळे मुंबईकर त्रस्त, मात्र मंत्री शंभूराज देसाई यांचं मौन - PM Modi Road Show
Last Updated : May 16, 2024, 8:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details