महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 9:40 PM IST

ETV Bharat / state

चार्टर्ड अकाउंटंट भूषण अरोरा यांच्या अपहरणप्रकरणी चार आरोपींना अटक

Bhushan Arora Kidnapping Case : डिव्हाईन पॉवर कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट भूषण अरोरा यांचं अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना न्यायालयात हजर केलं असता, आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Bhushan Arora Kidnapping Case
Bhushan Arora Kidnapping Case

दत्ता नलावडे माहिती देताना

मुंबईBhushan Arora Kidnapping Case : पवई पोलीस ठाण्यात चार्टर्ड अकाउंटंटचं अपहरण केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच चार्टर्ड अकाउंटंटची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नरवडे यांनी दिली आहे. अमोल परशुराम म्हात्रे (वय 49 वर्षे), निरंजन इंद्रमोहन सिंग (वय 32 वर्षे), विधिचंद्र गयाप्रसाद यादव (वय 31 वर्षे), मोहम्मद सुलेमान उर्फ सलमान मोहम्मद मोनिब शेख (वय 20 वर्षे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, चारही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे.

भूषण अरोरा यांच्याकडून फसवणूक : डिव्हाईन पॉवर कंपनीत सीए म्हणून कार्यरत असलेल्या 40 वर्षीय भूषण अरोरा यांनी अबू धाबीमधील अनेक गुंतवणूकदारांना ऑनलाइन लेक्चर्सचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडलं होतं. त्यानंतर डिव्हाईन पॉवर कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. त्यामुळं 2022 मध्ये या कंपनीविरुद्ध ठाणे पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. एका प्रदर्शनात सीए भूषण अरोरा यांना काही गुंतवणूकदारांनी पाहिलं होतं. तसंच भूषण अरोरा यांच्याकडं 80 ते 90 कोटी रुपये जमा असल्याची माहितीही गुंतवणूकदारांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी अरोरा यांच्या अपहरणाचा कट रचला होता.

17 जानेवारी अरोरा यांचं अपहरण : चारही आरोपींनी भूषण अरोरा यांच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवली होती. भूषण अरोरा यांनी चारही आरोपींचे सुमारे दोन कोटी रुपये बुडवले होते. त्यामुळं आरोपींनी भूषण अरोरा यांचं अपहरण केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे. 17 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास साकीनाका येथील बुमरँग इमारतीतील कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर आरोपींनी भूषण अरोरा यांचं अपहरण केलं होतं.

5 कोटींची खंडणी :अपहरणासाठी वापरलेली कार आरोपी अमोल परशुराम म्हात्रे याच्या मित्राची असून सराईत गुन्हेगारांप्रमाणेच आरोपींनीही डुप्लिकेट नंबर प्लेट लावली होती. तसंच आरोपींनी भूषण अरोराच्या पत्नीला गोवंडी, ऐरोली, रसानी अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून फोन केला होता. तसंच त्यांनी अरोरा यांच्या पत्नीकडं 5 कोटींची खंडणी मागितली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पवई पोलिसांच्या पथकानं पनवेल येथील फार्महाऊसची झडती घेतली. तेव्हा तिथं भूषण अरोरा आढळून आले. भूषण अरोरा यांच्या पत्नीनं 19 जानेवारी रोजी पवई पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 364A तसंच 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा -

  1. पुण्यात मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाला तुफान गर्दी, आरक्षणासाठी जरांगे यांची मुंबईकडं कूच
  2. मराठा आंदोलकांसाठी नाशिकहून मुंबईला रसद पुरवठा, हजारो मराठा बांधव पुण्याच्या दिशेने रवाना
  3. जरांगेंचं आंदोलन परवानगी घेऊन शांततेत होईल याची जबाबदारी शासनाची - मुंबई उच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details