मुंबई Coastal Road: काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कोस्टल रोडचं लोकार्पण केलं. त्यामुळं मुंबईकरांच्या वेळेत बचत होऊन वाहतूक कोंडीतून सुटका झालीय. कोस्टल रोडवरुन प्रवाशाना आता जलदगतीनं प्रवास करता येतोय. त्यामुळं कोस्टल रोडचा प्रकल्प मुंबईकरांसाठी क्रांतिकारी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. दरम्यान, कोस्टल रोडवरून महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रवास केल्यानंतर अतिशय जलदगतीनं, सुखरूप प्रवास झाल्याचं ट्विट केलंय. मात्र 'बिग'बींच्या एका ट्विटनंतर भाजपा तसंच ठाकरे गटामध्ये कोस्टल रोडवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
बिग'बींच्या ट्विटला भाजपाचं रिट्विट :कोस्टल रोडचा प्रवास जलदगतीनं झाला. जुहू ते मरीन ड्राईव्ह केवळ 30 मिनिटात प्रवास झाला. कुठंही थांबा नाही. "वाह! क्या बात है ! साफ सुथरी... नयी बढ़िया सड़क, कोई रुकावट नहीं", असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं. यानंतर अमिताभ यांच्या ट्विटला महाराष्ट्र भाजपानं रिट्विट करत अमिताभ बच्चन यांचे आभार मानलेत.
"आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है'…धन्यवाद अमिताभ बच्चनजी, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड टनलमधून तुम्ही प्रवास केलात याचा आम्हाला आनंद आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात तसंच राज्याचे विकासपुरुष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळंच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होतोय. भविष्यातदेखील मुंबईकरांना, राज्यातील जनतेला उत्तम दर्जाचे रस्ते, पायाभूत सोयीसुविधा मिळणार हीच मोदीजींची गॅरंटी," असं भाजपानं केलेल्या रिट्विटमध्ये म्हटलं आहे.
कोस्टर रोड आमचे स्वप्न :कोस्टल रोडचं श्रेय भाजपा घेत आहे. मात्र कोस्टल रोडच्या प्रकल्पाशी भाजपाचा काहीही संबंध नाही. याशिवाय कोस्टल रोडसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं 2 वर्ष उशीरा परवानगी दिली. कोस्टल रोडची घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. स्वत:हून न केलेल्या कामांसाठी नेहमीप्रमाणे श्रेयासाठी हताश असलेल्या भाजपानं अमिताभ बच्चन यांना रिट्विट केलं आहे. कोस्टल रोडचं अर्धवट काम असताना श्रेयासाठी याचं लोकार्पण करण्यात आलं. ही एक गंमत आहे. जर मविआ सरकारमध्ये असते, तर आम्ही खर्चात वाढ न करता डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण काम पूर्ण केले असते. मात्र, मागील वर्षी पूर्ण होणारे काम, 2024 च्या मध्यापर्यंत अर्धवट आहे. प्रत्येक महिन्याला अंतिम मुदत पुढं ढकलली जाते. कोस्टल रोडचं श्रेय लाटण्याचा भाजपाकडून प्रयत्न सुरु आहे. पण कोस्टर रोड हे आमचे स्वप्न होते, हे मुंबईकरांना माहीत आहे. अशी टीका आदित्य ठाकरेंनी भाजपावर केली आहे.
भाजपामुळेच चंद्र, सूर्य :जेव्हा कोस्टल रोडचं भूमिपूजन झालं, तेव्हा ते भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. याचं फोटो देखील आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसंच भाजपा श्रेय घेण्यासाठी काहीही करु शकतो. देशात जे काही सर्व घडलं, ते फक्त भाजपामुळंच आहे. चंद्र, सूर्य आपणच निर्माण केले आहेत, असंही भाजपानं म्हटल्यास नवल वाटायला नको, असा टोला आदित्य ठाकरेंनी भाजपाला लगावला आहे.
हे वाचंलत का :
- राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज भरताच भाजपाच्या नेत्यांचा निशाणा, म्हणाले... - Rahul Gandhi
- उत्तर मध्य मुंबईत आता होणार तिरंगी लढत, एमआयएमनं अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिला उमेदवार - lok sabha election 2024
- ठाण्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली; नरेश म्हस्के यांच्या रॅलीत गुंडांची मारामारी - Gangster fight Naresh Mhaske Rally