मुंबईOnline Money Fraud:6 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान हा गुन्हा घडला असून काल (18 एप्रिल) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे यांनी दिली आहे. तक्रारदार मयूर कदम (वय 35 वर्षे) हे आयसीआयसीआय बँकेत उपव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सायबर गुन्हेगारांनी टेलिग्राम अँपद्वारे वर्क फ्रॉम होम देण्याच्या नावाखाली 7 लाख 51 हजार 785 रुपयांना गंडा घातला असल्याची माहिती दिली आहे.
अकाउंटमध्ये आले 17 हजार रुपये :तक्रारदार मयूर कदम यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले की, 6 एप्रिल रोजी सायंकाळी 5:55 मिनिटांनी टेलिग्राम या ॲपवर नीलिमा नावाच्या अकाउंट वरून महिंद्रा अँड स्पेस या कंपनीतर्फे वर्क फ्रॉम होम जॉबची ऑफर देण्यात आली. या जॉबच्या ऑफरला तक्रारदार यांनी होकार दिला. त्यानंतर नीलिमा नावाच्या अकाउंटवरून तक्रारदार यांना एक लिंक पाठवण्यात आली. मेसेजद्वारे रायटिंग देऊन टास्क पूर्ण करायला सांगून त्या बदल्यात पैसे देण्याचे तक्रारदार यांना सांगण्यात आले. पैसे पाठवण्यासाठी आरोपींनी पारिख इंटरप्राईजेस या नावाने असलेले बँक अकाउंट नंबरवर दहा हजार रुपये पाठवण्यास सांगितले. त्यावर तक्रारदार यांनी एनईएफटी ने 10 हजार पाठवले. त्याबदल्यात तक्रारदार यांच्या अकाउंटवर 17 हजार रुपये आले.
वारंवार पैसे भरण्यास पाडले भाग :तक्रारदार यांनी ग्लोबल इलेक्ट्रॉनिक्सच्या बँक अकाउंटवर 53 हजार 177 रुपये इतकी रक्कम भरली. 13 एप्रिल रोजी तक्रारदाराचा टास्क पूर्ण करण्याकरिता मा. प्रोव्हिजन स्टोअरच्या अकाउंट नंबरवर एनएईएफटीद्वारे एक लाख रुपये आणि दुसरा बँक अकाउंट वरून आणखी इंटरप्राईजेसच्या बँक अकाउंटवर बेचाळीस हजार तीनशे चार रुपये पाठवले. 14 एप्रिल रोजी रात्री आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान तक्रारदाराने आयसीआयसीआय बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट केल्यानंतर दहा मिनिटातच 60 हजार 500, 34 हजार रुपये, 63 हजार पाचशे रुपये, 79 हजार रुपये, 99 हजार पाचशे रुपये आणि 97 हजार पाचशे रुपये अशी एकूण चार लाख 34 हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराने कॅश डिपॉझिटद्वारे अकाउंटवर भरली. त्यावर 15 एप्रिलला आपल्या सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एक लाख रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने सिल्वर ट्रेडिंग अकाउंटवर ५४७०४ रुपये आणि राधे इंटरप्राईजेस अकाउंटवर 45 हजार रुपये पाठवले. ही रक्कम भरल्यानंतर तक्रारदाराला त्याने पाठवलेले रक्कम फ्री झाली असल्याचे सांगून 11 लाख रुपये भरल्यानंतर एकूण कमिशनसह 33 लाख रुपये तक्रारदाराच्या बँक अकाउंटला जमा होतील अशी बतावणी केली. यावर मयूर कदम या तक्रारदाराला संशय आल्याने त्याने काल एन एम जोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
- यूट्यूबवरील व्हिडिओ लाईक करण्याचं काम, टास्क पूर्ण करताच 55.35 लाखांची फसवणूक
- Mumbai Cyber Crime : प्रलोभनाने भुलवून ओढतात सायबर क्राईमच्या विळख्यात, लॉकडाऊन नंतर नोकरी फसवणुकीच्या प्रमाणात वाढ
- Cyber fraud with High Court Chief Justice : कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची सायबर फसवणूक; जामतारा येथून 4 गुन्हेगारांना अटक