महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Facebook Messenger Fraud News : फेसबुक मेसेंजरद्वारे लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरोपीस अटक

Facebook Messenger Fraud News : फेसबुक यूजर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. बनावट फेसबुक (Facebook) अकाउंट तयार करून एका व्यक्तीनं फेसबुक मेसेंजरद्वारे लाखोंचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.

Facebook Messenger Fraud News
आरोपीस अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 11:01 PM IST

मुंबई Facebook Messenger Fraud News : सायबर गुन्ह्यासाठी सिमकार्ड विक्री करणाऱ्या आरोपीस वांद्रे पोलिसांनी अटक केलीय. याप्रकरणी भारतीय दंड संविधान ४१९ आणि ४२० तसेच माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ ड आणि ६६ क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जळगाव येथे राहणाऱ्या आरोपी अजय प्रल्हाद बिऱ्हाडे (वय २५) याला वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) अटक केलीय.

वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : २७ डिसेंबर २०२३ ते १ मार्च मार्च २०२४ दरम्यान तक्रारदार असलेल्या मुसा मोहीयोद्दीन शेख (वय ७२ वर्षे) यांची अज्ञात व्यक्तीने फेसबुक मेसेंजरवर फसवणूक (Facebook Messenger)केली होती. शेख हे सेवानिवृत्त असून ते त्यांच्या घरी असताना अनोळखी व्यक्तीनं मधुकर गावित या नावाचं बनावट फेसबुक अकाउंट तयार करून तक्रारदार शेख यांना फेसबुक मॅसेंजरव्दारे संपर्क केला आणि त्याचा मित्र सीआरपीएफ मध्ये नोकरी करत असून त्याच्या घरातील वेगवेगळ्या वस्तु स्वस्तात विकण्याच्या बहाण्यानं तक्रारदार यांना एकूण १ लाख ७६ हजार ५०० रूपये पाठविण्यास भाग पाडून फसवणूक केली. अशी तक्रार शेख यांनी दिली. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Statio) भारतीय दंड संविधान कलम ४१९, ४२० सह कलम ६६ (क) आणि ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

अजयचा साथीदार हा वाँटेड आरोपी: या गुन्हयाच्या केलेल्या तपासावरून हा गुन्हा करण्याकरिता वापरण्यात आलेले सीमकार्ड हे आरोपी अजय प्रल्हाद बिन्हाडे, (वय २५ वर्षे) याच्याकडून घेतल्याचं उघडकीस आलं. आरोपी अजय बिऱ्हाडे हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे राहत असून आरोपी अजय बिऱ्हाडे याने अलवार राजस्थान येथे विक्री केल्याचं निष्पन्न झालं आहे. म्हणून आरोपी अजय बिऱ्हाडे याला अमळनेर येथून अटक करण्यात आलीय. आरोपीनं एकूण ४५० सिमकार्ड अलवार, राजस्थान येथील त्याच्या सहकाऱ्यास विक्री केल्याचं निष्पन्न झालंय. हे सिमकार्ड विक्री केलेल्या अलवार मधील आरोपी अजयचा साथीदार हा वाँटेड आरोपी आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून या गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.

यांनी कामगिरी पार पाडली: वांद्रे पोलीस ठाण्याचे सायबर प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, पोलीस हवालदार मदन तानाजी मोरे, पोलीस हवालदार संतोष मंगेश पवार, पोलीस शिपाई बनसोडे आणि पोलीस शिपाई गणेश हंचनाळे (तांत्रिक मदत) यांनी याप्रकरणी कामगिरी पार पाडली आहे.

हेही वाचा -

  1. अंधाराचा फायदा घेत आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  2. पुणे अंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात ईडीची उडी; मास्टरमाईंड संदीप धुणेची प्रेयसी पोलिसांच्या रडारवर
  3. हत्याकांड प्रकरणात गँगस्टरला भिवंडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या, उत्तर प्रदेशात जाऊन केली कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details