महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीचं पोस्टमार्टम झालंय, नवनीत राणांच्या उमेदवारीवरून बच्चू कडू यांची टीका - Bachu Kadu criticizes Navneet Rana - BACHU KADU CRITICIZES NAVNEET RANA

Bachu Kadu criticizes Navneet Rana : नवनीत राणा यांच्याबद्दलचा राग आहे. 100 पानांचा हायकोर्टाने रिझल्ट दिलाय. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे. कोर्टात केस पेंडिंग असतानाही इथं उमेदवारी दिली जाते असं म्हणत या तानाशाहीच्या विरोधात आमची खरी लढाई असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

बच्चू कडू आणि नवनीत राणा
बच्चू कडू आणि नवनीत राणा

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 8:24 PM IST

बच्चू कडू

छत्रपती संभाजीनगर :Bachu Kadu criticizes Navneet Rana: प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. काल आमची नांदेडला एक बैठक झाली. जालना, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांची आज संभाजीनगरला अशी एक प्रमुख तालुक्याची आणि संयुक्त बैठक आम्ही आज घेतलेली आहे. लोकसभेबाबत आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने समोर गेलं पाहिजे यासाठी ही बैठक आहे. जे मुद्दे या भागातले आहेत. (Bachu Kadu criticizes Navneet Rana) निवडणुकीमध्ये त्या संदर्भातील काही समस्या देखील आपण जाणून घेतल्या पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्ते असं सांगत आहे की, आम्हाला भरपूर त्रास झालाय. जालन्याच्या खासदारांना प्रचंड त्रास दिला, काही जण सांगतात की निलेश लंके चांगले आहेत. तर हा सगळा विचार यांचा निर्णय घेऊन एका निर्णयापर्यंत आपल्याला जावं लागणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. त्यासाठी ही प्राथमिक बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. चार जिल्ह्यांची ही बैठक होती आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते त्याचा मेळावा घेऊन त्या निर्णयापर्यंत आपण जाऊ असंही त्यांनी सांगितलं आहे.

अमरावती लोकसभेवर बोलताना :मला असं वाटतं की, आता अमरावतीचं काही राहिलेलं नाही. अमरावतीचं पोस्टमार्टम झालं आहे. फक्त निकाल बाकी आहे आणि तो म्हणजे प्रहारचाच आहे. मी पहिलं सांगितलं की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तरी आता पुढचा निर्णय युतीने घ्यावा की, आमची आणि त्यांची लढत त्यांच्या विरोधात नाही. आम्ही युतीतून बाहेर जावं की राहावं तो त्यांचा निर्णय सध्या महायुतीकडे आहे. त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. नवनीत राणा यांच्याबद्दलचा राग आहे. 100 पानांचा हायकोर्टाचा निकाल दिलाय. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे. (Amravati Lok Sabha constituency) गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलं असताना, अडीच वर्षे सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असतानाही इथे उमेदवारी दिल्या जातील. या तानाशाहीच्या विरोधात आमची खरी लढाई असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. दरम्यान, रवी राणांची जी वागणूक आहे ती अतिशय राग येणार आणि संताप आणणारं आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मी स्वतःचा अपमान सहन करेन पण कार्यकर्त्यांचं काय? त्यामुळे आमचा प्रहार पक्ष कायम राहिला पाहिजे म्हणून आम्ही अमरावतीमधून उमेदवारी दिली आहे.

जरांगे आणि आमचा संबंध नाही : मुंबईच्या दौऱ्यानंतर जरांगे पाटील आणि माझा संबंध नाही. त्यानंतर त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही. मी त्यांच्यासोबत गेलो होतो. त्यावेळेस राजकीय विचार नव्हता, सामाजिक विचार होता. त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढवावी यासाठी मी त्यांना फोन करणार नाही, कारण आमचा तो स्वभाव नाही. आता ब्रह्मदेव खाली आला तरी आम्ही निवडणूक लढणारच. विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहतो तो आम्ही कायम ठेवणार. नितेश राणे काय सांगणार ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का? ते आले तरी आम्ही निवडणूक लढणारच. नितेश राणे अजून खूप छोटा आहे, त्याला अजून बरीच समज यायची आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी मी कोणती प्रतिक्रिया देण्यासाठी इच्छूक नाही, मी फक्त त्यांनी उपोषण सोडलं पाहिजे म्हणून प्रयत्न केले तेवढा माझा हस्तक्षेप होता त्यापेक्षा जास्त नाही, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

'महायुतीतून बाहेर पडण्याची माझी इच्छा नाही' : आमच्या जिथे ग्रामपंचायत आहे तिथे निधी दिला जात नाही, तर जो आहे तो काढून घेतला जातो म्हणून आम्हाला आमचे निर्णय घ्यावे लागतील. आमचा पक्ष दिल्लीत आणि मुंबईत चालत नाही, गावा खेड्यात चालतो. आम्हाला दिल्ली मुंबईची वारी करायची गरज नाही. जालन्यात काँग्रेसला मदत करावी असं कार्यकर्त्यांचं मत आहे. मात्र, अजून निर्णय नाही. पूर्ण बैठका झाल्यावर निर्णय घेऊ. जर तर वर विश्वास ठेवून चालणार नाही. आम्ही अमरावतीची जागा लढू असं म्हटलं नव्हतं पण मोठ्या पक्षाने चुका केल्या त्यामुळे लढावं लागतंय. महायुतीतून बाहेर पडण्याची माझी इच्छा नाही, त्यांची तशी इच्छा असेल तर आनंदाने ते स्वीकारू असंही कडू म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details