मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 नोव्हेंबरला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं आणखी पाच आरोपींना मुंबईतील विविध भागातून अटक केली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एकूण नऊ आरोपींना अटक : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आणखी ५ आरोपींना अटक केली आहे. या पाचही आरोपींना डोंबिवली, अंबरनाथ आणि पनवेल परिसरातून अटक करण्यात आली. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण 9 जणांना अटक करण्यात आली असून, चार आरोपी मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. मुंबई गुन्हे शाखेनं अटक केलेल्या 5 आरोपींना न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी 12 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींना न्यायालयानं 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बिश्नोई गँगशी संपर्कात : पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी दोन मुख्य हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून एक मुख्य हल्लेखोर अद्याप फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे. अटक इतर आरोपी हे गोळीबार करणाऱ्यांना शस्त्रे आणि पैसे पुरवत असे. तसंच फोनवरून ते बिश्नोई गँगशी जोडले गेल्याचा संशय असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
झिशान सिद्दीकींनी घेतली फडणवीसांची भेट : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं राज्यात खळबळ उडाली होती. बाबा सिद्दीकी हे अभिनेते सलमान खानच्या जवळचे होते. त्यामुळंच बिश्नोई गँगन त्यांची हत्या केल्याचं बोललं जातंय. तसंच याबाबतची एक कथित पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळं या हत्येमागं बिश्नोई गँग असल्याचा संशय वाढला होता. या प्रकरणावरुन राजकारणही तापलं होतं. त्यामुळं बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावप पोस्ट शेयर करत, या प्रकरणाचं राजकारण न करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच झिशान सिद्दीकींनी शुक्रवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती.
हेही वाचा -
- "सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट होईल"-मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज
- वडिलांच्या मृत्यूचं राजकारण करू नका; झिशान सिद्दीकींनी व्यक्त केली भावना
- बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : शुभम लोणकर विरोधात लूक आऊट नोटीस, हत्येसाठी ऑस्ट्रेलियातून पिस्तूल मागवल्याचा संशय