महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशाल अग्रवाल यांनी वडील म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं नाही, २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी - Asim Sarode Blames Vishal Agarwal - ASIM SARODE BLAMES VISHAL AGARWAL

Asim Sarode Blames Vishal Agarwal : पुण्यातील कल्याणी नगर येथील 'हिट अँड रन' प्रकरणात अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवाल यांनी वडील म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं नाही, असा आरोप वरिष्ठ वकील असीम सरोदे यांनी ठेवला आहे.

Asim Sarode Blames Vishal Agarwal
असीम सरोदे (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 7:56 PM IST

Updated : May 22, 2024, 8:12 PM IST

पुण्यातील हिट एन्ड रन प्रकरणी मत मांडताना वकील असीम सरोदे (Reporter)

पुणेAsim Sarode Blames Vishal Agarwal : विशाल अग्रवाल यांच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांनासुद्धा पुणे सत्र न्यायालयाने 'हिट अ‍ॅन्ड रन' प्रकरणी ३ दिवसांची कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवाल हे अल्पवयीन तरुणाचे वडील असून त्या अपघातानंतर पुणे पोलिसांनी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती. अखेर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं.

'या' कारणामुळे पोलीस कोठडी :याबाबत अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले की, ज्या कारणावरून जामीन मागितला जात होता ते कारण आता लक्षात घेतलं जाणार नसल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं. जे वडील आरोपी आहेत त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही. जेव्हा गाडीचं रजिस्ट्रेशन नव्हतं गाडीला नंबर प्लेट नव्हती आणि आपल्या मुलाकडे लायसेन्स नाही हे माहीत असताना देखील वडील अग्रवाल यांनी गाडी चालवायला दिली. तसंच आपल्या मुलाचं वय 18 वर्षे पूर्ण झालेलं नसताना देखील पबमध्ये पाठवलं. हे चांगल्या पालकांचं लक्षण नाही. म्हणून कोर्टानं अग्रवाल यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

पालक म्हणून त्यांचं अपयश :अ‍ॅड. असीम सरोदे पुढे म्हणाले की, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असला तरी पुण्यातील सगळ्यांचे जीव धोक्यात आहेत. एखाद्या श्रीमंताकडून अपघात झाला तर त्याला काहीही होत नाही ही जी न्यायाची असमानता आहे ती देखील खूप महत्त्वाची आहे. आज आम्ही कोर्टात देखील लेखी स्वरूपात दिलं आहे की, आरोपीकडे जर लायसेन्स नसेल आणि तो 18 वर्षांखालील असेल आणि त्याला दारू पिण्यासाठी पबमध्ये पाठवण्यात येत असेल तर पालक म्हणून त्यांचं अपयश आहे. एवढे दिवस कार खरेदी करूनही रजिस्ट्रेशन का केलं नाही याची देखील चौकशी व्हायला पाहिजे. तसंच त्यांनी मुलाकडे लक्ष का दिलं नाही. तसंच या प्रकरणात दोन 'एफआयआर' असणं हे खूपच चुकीचं आहे.

राहुल गांधी यांचीही टीका :काल या प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील व्हिडिओ शेअर करत टीका केली होती. यावर देखील सरोदे म्हणाले की, राहुल गांधी यांचा गैरसमज झाला आहे. त्या अल्पवयीन मुलाला फक्त जामीन दिलेला आहे. त्याला सोडून देण्यात आलेलं नाही. त्या मुलाला काही नियम आणि अटीवर सोडण्यात आलं असल्याचं यावेळी सरोदे म्हणाले.

हेही वाचा :

  1. पुण्यातील वंदे मातरम् संघटनेकडून विशाल अग्रवाल यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न - Vishal Agarwal Ink Thrown case
  2. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी - pune porsche accident update
  3. भारतातील आर्थिक विषमता आणि असमानतेच्या मुळाशी आहे तरी काय, वाचा ईटीव्ही भारतचा विशेष वृत्तांत - Roots of Inequality in India
Last Updated : May 22, 2024, 8:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details