पुणे (पिंपरी चिंचवड) Ashadhi Wari 2024 :विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून ही 108 मण्यांची 'तुळशीमाळ' (Tulsi Mala) बनते. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं तुळशीमाळ म्हणजे, जगण्याचं अगाध तत्वज्ञान असतं. याच भावनेतून जसे स्त्रियांची ओळख मंगळसूत्राने होते, तसंच वैष्णवांची ओळख या तुळशीमाळेनं होते. देवाला तुळस प्रिय म्हणूनच त्याच औषधी तुळशीच्या लाकडापासून बनविलेली माळ ही वारकऱ्यांचे दैवत असते. तर या तुळशीमाळेचं काय महत्त्व ते जाणून घेऊयात.
वारकऱ्यांचं दैवत असलेल्या तुळशीमाळेचं महत्त्व (ETV BHARAT Reporter) हातानं तयार केलेली तुळशी माळ आधिक प्रभावी :आळंदी नगरीतील संत ज्ञानोबा रायांनी चालवलेल्या भिंतीजवळ 'गायत्री जपमाळ' हे 45 वर्षे जुने माळेचं दुकान आहे. याविषयी अंबादास चौधरी यांनी सांगितलं की, तुळशीमाळ बनवणं हे अवघड काम आहे. यात जास्त वेळ जातो. जर एखाद्या चांगल्या कारागिरानं बारा तास काम केलं तर 108 जप मण्यांनी एक किंवा दोन तुळशीची माळ तो बनवू शकतो. यंत्रापेक्षा हातानं बनवलेली 'तुळशीमाळ' जास्त प्रभावी असते. मात्र, हातानं तयार केलेली तुळशीमाळ बनवण्यासाठी पूर्ण तीन दिवस लागतात.
तुळशीमाळ बनवण्याचे साहित्य आणि कृती : 'तुळशीमाळ' ही तुळशीच्या झाडाचे लाकूड, मुळं आणि डहाळ्यांचा वापर करून बनवली जाते. तुळशीच्या झाडाचे लाकूड सोलल्यानंतर त्याचे 108 छोटे तुकडे केले जातात. तुकड्या, धागा किंवा स्ट्रिंगच्या मध्यभागी छिद्रे बनवून त्यामधून पार केले जाते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुळशीच्या मण्यांना 27, 54, किंवा 108 मणी असलेली तुळशीची माळ तयार करण्यासाठी थ्रेड केले जाते. तुळशीमाळ सतत वापरल्यानं त्याचे फायदे अनुभवता येतात. याने केवळ आध्यात्मिक लाभच मिळत नाही तर भौतिक लाभही मिळू शकतो, असं अंबादास चौधरी सांगतात.
तुळशी माळेचे फायदे: 'तुळशीमाळ' त्वचा रोगांवर उपचार करण्यासाठी चांगले कार्य करते. तुळशीमाळ ही सर्व अशुद्ध कर्म, वाईट शक्ती आणि वाईट विचारांना शुद्ध करते, एकाग्रता आणि रक्त परिसंचरण देखील सुधारते. नकारात्मक विचार, डगमगणारे मन, अहंकार, राग आणि इतर अनियंत्रित भावनांवर नियंत्रण ठेवते असं, अंबादास चौधरी सांगतात.
हेही वाचा -
- संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगर जिल्ह्यात दाखल; पाहा व्हिडिओ - Sant Nivruttinath Maharaj Palkhi
- 'जगात भारी पंढरीची वारी', विठू-रखुमाईच्या भक्तांना संदीप पाठक देतोय वारीची अनुभूती - Jagat Bhari Pandharichi Wari
- पालखी सोहळ्यात सुनेत्रा पवारांनी खेळली फुगडी - Ashadhi Palkhi sohala