रजनी पंडित यांची प्रतिक्रिया मुंबईAppointment of detectives : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं खासगी गुप्तहेरांच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत विरोधी पक्ष तसंच सत्ताधारी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळं विरोधी पक्षांची हेरगिरी करण्यासाठी राजकीय पक्ष गुप्तहेरांकडं वळल्याचं दिसून येत आहे. तसंच जनतेचं मत जाणून घेण्यासाठी देखील राजकीय पक्ष गुप्तहेरांची मदत घेताना दिसत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी, अनेक पक्षांकडून गुप्तहेरांच्या संस्थांना काम मिळण्यास सुरूवात झाली आहे.
गप्तहेरांची मागणी वाढली :लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.आता गुप्तहेरांची देखील मागणी वाढली आहे. मी अनेक पक्षांचं काम करत असून मला कोणत्याही विशिष्ट पक्षाशी काही देणंघेणं नाही. काही दिवसांत राजकीय पक्षांच्या प्रचारालाही सुरुवात होणार आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, मनसे अशा पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दोन पक्षांत फूट पडल्यानं आणखी कामं येतील, असा अंदाज आहे, असं रजनी पंडित यांनी म्हटलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका भारतातील सत्ताधारी पक्ष तसंच विरोधी पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. या निवडणुका भविष्यकाळासाठी लक्षवेधी ठरणार आहेत. गेल्या वेळी 2019 ची लोकसभा निवडणुकही रंजक झाली होती. त्यामुळं 2024 च्या 18 व्या लोकसभा निवडणुकीत देखील रंगदार स्पर्धा पहायला मिळणार आहे, असं रजनी पंडित यांनी सांगितलं.
निवडणुकीत खासगी गुप्तहेरांची मदत : लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अनेक राजकीय पक्ष निवडणुकींवर पैसा खर्च करतात. विविध पक्षांच्या सभांमध्ये देखील निवडणुकीबाबत जोरदार चर्चा सुरू असते. त्यामुळं जनतेत जाऊन लोकांचा कल माहिती करुन घ्यावा लागतो. त्याच्या चर्चा ऐकून त्याचा आढावा घ्यावा लागतो. त्यातून जनतेला कोणत्या पक्षाला सत्तेत बसवायचं याचा अंदाज बांधता येतो. त्याचप्रमाणे कोणता मतदार पैसे घेऊन विकला जाणार आहे, याबाबत माहिती काढण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत घेतली जाते. निवडणुकीच्या काही दिवस आगोदर राजकीय पक्ष गुप्तहेरांची मदत घेऊन उमेदवारांबाबत माहिती मिळवत असतात.
गुप्तहेरांकडून फसवणुकीची शक्यता : लोकसभेच्या निवडणुका राज्यात पाच टप्प्यात होणार असून विधानसभा निवडणुकाही सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं खासगी गुप्तहेरांचा व्यवसाय तेजीत आला आहे. त्यासाठी एका दिवसाला 10 ते 20 हजार रुपये डिटेक्टिव्ह एजन्सीला द्यावे लागतात. गेल्या काही दिवसांपासून गुप्तहेरांचं काम तेजीत आल्याचं दिसतंय. मात्र, कोणतीही माहिती काढण्यासाठी खासगी गुप्तहेरांसाठी आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतोय. त्यामुळं खात्रीलायक गुप्तहेरांकडूनच आपण माहिती घ्यायला हवी, असा मोलाचा सल्ला रजनी पंडित यांनी दिला आहे. सध्या गुप्तहेरांचा सुळसुळात झाला आहे. त्यामुळं नागरिकांकडून पैसे उकळण्याचे काम त्यांच्याकडून होतंय. नागरिकांनी देखील सतर्क राहून खात्रीलायक गुप्तहेरांचीच नेमणूक करायला हवी, असं मत देखील त्यांनी व्यक्त केलंय.
हे वाचलंत का :
- बारामतीनंतर आता रावेरमध्येही खडसे विरुद्ध खडसे? नणंद-भावजयीत लढतीची शक्यता - Raver Lok Sabha Constituency
- अरविंद केजरीवालांची ईडी मागणार 10 दिवस कोठडी?; आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - ED Arrested Arvind Kejriwal
- अरविंद केजरीवाल यांना अटक: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'कर्माची फळं भोगतायत' - Anna Hazare News