महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश, दहशतवाद विरोधी पथकाकडून एकाला अटक - Unauthorized Telephone Exchange - UNAUTHORIZED TELEPHONE EXCHANGE

Unauthorized Telephone Exchange :दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातून एकाला अटक करण्यात आलीय. तो अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालवत होता. नौशाद अहमद सिद्दीकी असं त्याचं नाव आहे. पोलिसांनी ही माहिती दिलीय.

पुण्यातून एकाला अटक
पुण्यातून एकाला अटक (File photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 3:19 PM IST

पुणे Unauthorized Telephone Exchange : पुण्यातील कोंढवा येथे गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालवणाऱ्या एकाला दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. नौशाद अहमद सिद्दीकी, वय ३२ वर्षे असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्याकडून विविध कंपन्यांचे ७ सिम बॉक्स, ३७८८ सीम कार्ड, ९ वायफाई राउटर, सिमबॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटीना, सीमबॉक्स कायम कार्यान्वीत राहावा याकरीता वापरण्यात येणारे इनव्हर्टर, लॅपटॉप असा मुदद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज -याबाबत अधिक माहिती अशी की, बेकायदेशीर सिमबॉक्सच्या सहाय्याने अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथक पुणे युनिट यांनी अधिकारी तसंच शासकीय पंच यांच्या समवेत त्याच्या कार्यक्षेत्रातील कोंढवा परिसरातील एम ए कॉप्लेक्स, मीठा नगर, कोंढवा या ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा शोध घेतला. या छापा कारवाई दरम्यान विविध कंपन्यांचे ७ सिम बॉक्स, ३७८८ सीम कार्ड, ९ वायफाई राउटर, सिमबॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटीना, सीमबॉक्स कायम कार्यान्वीत राहावा यासाठी वापरण्यात येणारे इनव्हर्टर, लॅपटॉप असा मुदद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज मागील किती वर्षापासून चालू होते, याबाबत तपास सुरू आहे.


पोलिसांचं आवाहन -आरोपी नैशाद हा पैसे कमवण्याच्या उदद्देशाने बेकायदेशीर सिमबॉक्सच्या सहाय्याने अनधिकृत टेलीफोन एक्सचेंज चालवत होता. त्यामुळे दूरसंचार विभाग, भारत सरकार आणि मोबाईल कंपन्यांची आर्थिक फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं असून त्याच्या विरुध्द दहशतवाद विरोधी पथक पो. ठाणे गु. र. नं. ०७/२०२४ कलम ३१८(४), भारतीय न्याय संहिता सह भारतीय टेलिग्राफ कायदा १८८५ मधील कलम ४, मह द टेलिकम्युनिकेशन कायदा २०२३ चे कलम ४२ तसंच इंडियन वायरलेस टेलीग्राफी कायदा १९३३ कलम ३ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएस विभागानं दहशतवादी कृत्यास सहाय्य होईल असं अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त केलं आहे. तसंच भारत सरकारच्या टेलिफोन विभागाची भविष्यात होणारी आर्थिक फसवणूक यास प्रतिबंध केला आहे. आपल्या परिसरात असं अनधिकृत टेलीफोन एक्सचेंज सुरू असल्यास जवळचे पोलीस स्टेशन अथवा एटीएमशी संपर्क साधावा असं नागरिकांना आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details