महाराष्ट्र

maharashtra

विधानपरिषदेत अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात खडाजंगी - Ambadas Danve On Prasad Lad

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 7:29 PM IST

Ambadas Danve On Prasad Lad: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. या मुद्द्यावरुन सभागृहात जोरदार खडाजंगी रंगली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची बोलताना जीभ घसरली.

Ambadas Danve And Prasad Lad
अंबादास दानवे आणि प्रसाद लाड (ETV BHARAT MH DESK)

मुंबई Ambadas Danve On Prasad Lad : हिंदू धर्मातील नागरिकांविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाचा मुद्दा आज विधान परिषदेमध्ये सुद्धा गाजला. राहुल गांधी यांच्याबाबत निषेध ठराव घेण्याची मागणी भाजपाच्या वतीनं सभागृहात करण्यात आली. तर राहुल गांधी यांचा या सभागृहाशी संबंध काय असं सांगत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जीभ घसरली आणि या कारणाने अंबादास दानवे यांनी आपल्याला शिवीगाळ केली होती असा आरोप, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. इतकेच नाही तर दानवे यांनी राजीनामा देऊन सर्वांची माफी मागावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केलीय. यामुळं विधान परिषदेमध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. अखेर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.



दानवे यांनी राजीनामा देऊन माफी मागावी :लोकसभेमध्ये हिंदू धर्मातील नागरिकांविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा आज विधान परिषदेमध्ये सुद्धा गाजला. राहुल गांधी यांच्याबाबत निषेध ठराव मांडण्याची मागणी भाजपा नेते प्रसाद लाड यांनी केली. यावरून सभागृहात विरोधकांनी हंगामा केला. या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी सभागृहात अपशब्द वापरले. दानवे यांच्या वक्तव्यानं भाजपा नेते आक्रमक झाले आणि त्यांनी दानवे यांनी राजीनामा द्यावा आणि माफी मागावी अशी मागणी केलीय. यावरून या मुद्द्यावर सभागृहात दोन्ही बाजूंनी जोरदार खडाजंगी झाली.

मी जे काही सभागृहात बोललो ते बोललो आहे. तसा मी कुणालाही घाबरत नाही आणि माझ्यावर जी काही कारवाई करायची असेल तर त्याबाबत माझा पक्ष ठरवेल. परंतु पैसे घेऊन काम करणाऱ्या प्रसाद लाड यांनी मला हिंदुत्व शिकवू नये. त्यांनी माझ्याकडं हातवारे केले म्हणून माझ्यातील शिवसैनिक जागा झाला आणि मी त्यांना प्रतिउत्तर दिलं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर माझ्यावर सुद्धा ७५ केसेस आहेत. मी अनेकदा तडीपारच्या केसेसला सामोरे गेलो आहे. म्हणून प्रसाद लाड यांनी काय आरोप केले, त्याला मी जास्त महत्व देत नाही. - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

हेही वाचा -

  1. तेलंगाणाच्या धर्तीवर राज्यात शेतकरी कर्जमाफी अन् वीजबिल माफी करा - विजय वडेट्टीवार
  2. "सरकार मराठा...."; आरक्षण प्रश्नावरुन अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
  3. भाजपाची 'जैसी करणी वैसी भरणी', विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details