महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीचे सर्व आमदार आमच्यासोबत, अजित पवारांचा दावा; म्हणाले, पराभवाची जबाबदारी... - Ajit Pawar on Lok Sabha Results

Ajit Pawar on Lok Sabha Results : लोकसभा निवडणूक निकाल (Lok Sabha Election Results 2024) लागल्यानंतर सर्वच पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीची गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे बडे नेते हजर होते. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत पराभवाची जबाबदारी स्वीकारली.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 10:32 PM IST

Updated : Jun 6, 2024, 10:42 PM IST

मुंबई Ajit Pawar on Lok Sabha Results : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election Results 2024 राष्ट्रवादीला केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळं महाविकास आघाडी प्रामुख्यानं शरद पवार गटातील नेत्यांनी अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतलं. यानंतर गुरुवारी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

पराभवाची जबाबदारी माझी - अजित पवार : निवडणुकीत आम्हाला अपयश आलं याचं आत्मपरीक्षण करणार आहोत. आम्ही आमचा पराभव मान्य करतो. यंदा मुस्लिम समाज आमच्यापासून दूर गेला, असं म्हणत मुस्लिम समाजाची मतं राष्ट्रवादीला पडली नसल्याची कबुली अजित पवार यांनी यावेळी दिली. लोकसभेतील अपयशाची जबाबदारी स्वीकारतो, असं म्हणत अपेक्षित आकडा गाठू शकलो नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

आम्ही कमी पडलो म्हणून हरलो : निवडणूक पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. याला दुसऱ्या कोणालाही कारणीभूत ठरवणार नाही. ज्या चुका झाला आहेत, त्या भविष्यात दुरुस्त करू आणि विधानसभेत चांगले यश मिळवू. बारामतीतील निकालानं मी आश्चर्यचकित झालो. आम्ही कमी पडलो म्हणून आम्ही हरलो, अशी कबुली अजित पवार यांनी दिली. जे बैठकीला येऊ शकले नाहीत, त्यांना फोनवरून संपर्क साधला आहे. ते सर्व आमच्या संपर्कात आहेत. सर्वांनी आपापल्या परीनं काम केलं. पण मीच कमी पडलो. अपयश आलं म्हणून मी दुसऱया कोणालाही दोषी धरणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे सर्व आमदार आमच्यासोबत : लोकसभेत राष्ट्रवादीला केवळ एकच जागा जिंकता आली. त्यावरुन शरद पवार गटातील नेत्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. या पराभवानंतर अजित पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. यावरुन राजकारणही तापलं होतं. आता याला खुद्द अजित पवार यांनी उत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचं अजित पवार म्हणाले.

Last Updated : Jun 6, 2024, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details