घटनेविषयी माहिती देताना प्रत्यक्षदर्शी आणि पोलीस अधिकारी अकोलाAkola crime : रतनलाल प्लॉट परिसरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या टेरिसवर चार अर्भकांचे तुकडे आढळून आल्यानं आज (11 फेब्रुवारी) सकाळी एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. शाळेच्या क्रीडांगणावर क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू टेरेसवर गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, या शाळेच्या जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर जिल्हा स्त्री रुग्णालय आहे.
असा उघडकीस आला प्रकार :अकोला जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या क्रीडांगणावर परिसरातील मुले क्रिकेट खेळत होती. त्यांचा चेंडू शाळेच्या टेरेसवर गेल्यानं चेंडू आणण्यासाठी एक मुलगा टेरेसवर पोहोचला. यावेळी त्याला पिवळ्या रंगाच्या थैलीमध्ये नवजात अर्भकाचे तुकडे दिसले. त्यानं आरडाओरड केल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली असता रामदासपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. पुढे पोलिसांनी पंचनामा करीत अर्भकाचे तुकडे ताब्यात घेतले. त्यांची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर ते अर्भक स्त्री की पुरूष जातीचे आहे, हे समजणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याठिकाणी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती.
अकोला जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या टेरेसवर एक अर्भक आढळून आलं आहे. त्याच्या बाजूला अभर्काचे तीन तुकडे मिळून आले आहेत. वैद्यकीय अहवालावरून पूर्ण घटना स्पष्ट होईल. -- आशिष जाधव, पोलीस निरीक्षक, सिव्हिल लाइन पोलीस ठाणे
अर्भकांची संख्या किती? अकोला जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या टेरेसवर सापडलेल्या पिवळ्या रंगाच्या पिशवीतील अर्भकांची संख्या किती हा प्रश्न निर्माण झाला आहे. एका अर्भकाचे तुकडे असल्याचा अंदाज पोलीस लावत आहेत. तर चार अर्भक असल्याचाही पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे उत्तरीय तपासणीनंतरच या घटनेचे मूळ समोर येणार आहे.
तीन ते चार महिन्यांचे अर्भक?रतनलाल प्लॉट परिसरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या टेरेसवर सापडलेले अर्भक हे तीन ते चार महिन्यांचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात वैद्यकीय अहवालानंतरच ते किती महिन्यांचे आहे, हे समजेल.
हेही वाचा:
- साताऱ्यात दहशतवादी असल्याच्या फोनमुळं पोलिसांची उडाली धावपळ, पुढे काय घडलं? वाचा बातमी
- गोविंददेवगिरी महाराज यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याचं कार्य केलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- रोहित पवारांचा संजय राऊतांना सवाल; गुन्हेगारांबरोबर देवेंद्र फडणवीसांचे फोटो बाहेर येत नाहीत?