महाराष्ट्र

maharashtra

महिलांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण" योजनेच्या अर्जासाठी मुदत वाढ...डोमिसाइलचीही गरज नाही - अजित पवार - Ajit Pawar On Ladki Bahin Yojana

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 10:45 PM IST

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) राज्यात एक जुलैपासून सुरू झालीय. अनेक महिलांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात तारांबळ उडत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळं अजित पवार यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केलीय.

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana
"माझी लाडकी बहीण" योजनेच्या तारखेत वाढ (Etv Bharat MH DESK)

मुंबई Ajit Pawar OnLadki Bahin Yojana : महायुती सरकारनं सद्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात महिलांसाठी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) जाहीर केली होती. त्याकरिता अर्ज भरणे सुरू झाले आहे. मात्र, योजनेचे अर्ज भरताना जाचक अटी अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी योजनेतील सुधारित बदल केल्याची माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV BHARAT Reporter)

३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत करता येणार अर्ज :उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता दोन महिने मुदत वाढविण्यात अली आहे. म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत महिलांना अर्ज करता येईल. तसंच अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, त्याऐवजी १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.

काय आहेत सुधारित बदल? :तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे ५ एकर शेतीची अट काढून टाकली आहे. योजनेसाठी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष होता. त्याऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट केला आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर, अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. अडीच लाखापर्यंत उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडं पिवळे आणि केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येणार आहे. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असेही अजित पवार यांनी निवेदनातून राज्यातील जनतेला सांगितलं आहे.

हेही वाचा -

  1. मध्यप्रदेशातील 'लाडली बहना' आता महाराष्ट्रात; महायुतीला ठरणार का तारणहार ? - Ladki Bahin Yojana
  2. लाडली बहना योजना महाराष्ट्रात लागू होणार, महिलांना मिळणार 1 हजार 250 मानधन
  3. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीकडून मागितली लाच; तलाठी निलंबित - Ladki Bahin Yojana

ABOUT THE AUTHOR

...view details