महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत महिला पायलटची आत्महत्या, प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एकाला अटक - PILOT DIES BY SUICIDE

महिला पायलट प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र (File image)

By PTI

Published : Nov 27, 2024, 9:43 PM IST

Updated : Nov 27, 2024, 10:55 PM IST

मुंबई -मुंबईत एका महिला पायलटनं आत्महत्या केलीय. एअर इंडियाच्या 25 वर्षीय महिला वैमानिकानं मुंबईतील तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या प्रियकराला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. मरोळ परिसरातील कनकिया रेन फॉरेस्ट इमारतीत राहणाऱ्या सृष्टी तुली हिने सोमवारी आत्महत्या केली.

तुलीच्या एका नातेवाईकाने तिच्यावर तिचा छळ केल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आणि तिला मांसाहार बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी तिचा प्रियकर आदित्य पंडित (२७) याला ताब्यात घेतलं, असं अधिकाऱ्यानं एफआयआरचा हवाला देऊन सांगितलं. पवई पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तुली ही उत्तर प्रदेशातील असून ती गेल्यावर्षी जूनपासून मुंबईत कामानिमित्त राहात होती. दोन वर्षांपूर्वी दिल्लीत कमर्शिअल पायलट कोर्स करत असताना तिची आणि पंडितची भेट झाली होती आणि ते रिलेशनशिपमध्ये आले होते.

पंडित कारनं दिल्लीला जायला निघाला त्यानंतर ही आत्महत्या उघडकीस आली. गाडी चालवताना तुलीने पंडितला फोन करून आयुष्य संपवणार असल्याचं सांगितलं. पंडितनं मुंबईत धाव घेतली आणि त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं, असं अधिकाऱ्याने सांगितलं. त्यानंतर त्याने चावी बनवणाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडला आणि तुली लटकलेली दिसली. तिला सेव्हनहिल्स रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घरात कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

तुलीच्या काकांनी नंतर पोलिसांकडे तक्रार केली की पंडित तिला अनेकदा त्रास देत असे आणि सार्वजनिक ठिकाणी तिचा अपमानही करायचा. याशिवाय, त्याने तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता, असा दावा केला.

काकांच्या तक्रारीच्या आधारे, पंडितला भारतीय न्याय संहित कलम 108 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

Last Updated : Nov 27, 2024, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details