नाशिक-नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांना प्रशिक्षण दिले जाते. याच प्रशिक्षण दरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास फायरिंग करत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटात दोन अग्नीवीर जवान जखमी झाले होते. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. गोहिल सिंग आणि सफत शीत अशी मृत अग्नीवीर जवानांची नावे आहेत.
नाशिकमध्ये अग्निवीरांच्या सरावा दरम्यान धक्कादायक घटना घडली. तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चित स्थळी न जाता तो जागेवरच फुटला. यावेळी झालेल्या स्फोटात दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाला. तर एक अग्नीवीर जखमी झाला आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोळीबाराच्या सराव दरम्यान तोफखाना फुटल्यानं झालेल्या अपघातात दोन अग्निवीरांना प्राण गमवावे लागले. हे अग्निवीर हैदराबादहून नाशिकच्या देवळाली येथील आर्टिलरी स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी आले होते. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सैन्य दलानं घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत : भारतीय सैन्य दल
कसा झाला स्फोट-देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प सैन्याच्या हद्दीतील इंडियन शील्ड गन या मैदानावर फायर रेंज आर्टिलरी येथे अग्नीवीरांचा सराव सुरू होता. यादरम्यान 12 तोफा लावून त्यावर प्रत्येकी सात अग्नीवीर गोळा फेकून आपले लक्ष्य भेदत होते. त्याच सुमारास तोफ नंबर 4 च्या तोंडी गोळा टाकण्यात आला. तो गोळा फायर केल्यानंतर लक्ष्य केलेल्या ठिकाणी न जाता तोफेपासून काही अंतरावर पडून स्फोट झाला.
संग्रहित (Source- ETV Bharat Repoter) जखमीवर उपचार सुरू-घटनेत अग्नीवीर शक्कीन शीत( वय 21, राहणार पश्चिम बंगाल व गोहिल विश्वराज सिंग ( वय 20, राहणार गुजरात ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अप्पाला स्वामी हा जखमी झाला. त्याला सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. भारतातील अग्नीवीरांच्या सरावा दरम्यान झालेल्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे अग्नीवीरांच्या भरतीबाबत पुन्हा एकदा विषय चर्चेत येण्याची शक्यता आहे.
देशातील सर्वात मोठे आर्टिलरी सेंट्रल प्रशिक्षण-सैन्यदलात दाखल झालेल्या तरुणांना घडविण्याचे आणि प्रशिक्षित करण्याचं काम नाशिकमधील आर्टिलरी सेंटरमध्ये केले जाते. या आर्टिलरी सेंटरची स्थापना 1948 साली स्थापना झाली. नाशिकमधील आर्टिलरी सेंटर हे देशातील सर्वात मोठे आर्टिलरी सेंटर म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी शेकडो तरुण या प्रशिक्षण केंद्रातून सैनिकी प्रशिक्षण घेतात. त्यानंतर देशाच्या सेवेसाठी कर्तव्य बजावितात.
हेही वाचा-