महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीकरिता प्रशासन सज्ज; 97 टेबलवर मतमोजणी होणार - Lok Sabha Election Results 2024 - LOK SABHA ELECTION RESULTS 2024

Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणूक-2024 च्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 रोजी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाकरिता झालेल्या मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहे. गडचिरोली जिल्हा हा नक्षलवाद्यांच्या कारवायांचे केंद्र असल्याने सुरक्षा यंत्रणासुद्धा चौकस आहेत.

Lok Sabha Election Results 2024
मतमोजणी केंद्रावर तैनात कर्मचारी (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 10:31 PM IST

गडचिरोलीLok Sabha Election Results 2024: गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमूर या सहा विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरिता 14 टेबल याप्रमाणे सहा विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण 84 टेबल लावण्यात आले आहेत. तसेच टपाली मतपत्रिकेच्या मतमोजणीसाठी 12 टेबल आणि इलेक्ट्रॉनिकली ट्रांसमिटेड पोस्टल बैलेट सिस्टमसाठी (ईटीपीबीएस) एक टेबल असे एकूण 97 टेबलवर मतमोजणी होणार आहे.

गडचिरोलीतील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज (ETV Bharat Reporter)

विधानसभानिहाय मतमोजणीच्या फेऱ्‍या : 66-आमगाव विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 23 फेऱ्‍या, 67-आरमोरी मतदारसंघात 22 फेऱ्‍या, 68-गडचिरोलीकरिता 26 फेऱ्‍या, 69 - अहेरीकरिता 21 फेऱ्‍या, 73- ब्रम्हपुरीकरिता 23 फेऱ्‍या आणि 74- चिमूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 23 फेऱ्‍या राहणार आहेत. यासोबतच प्रत्येक विधानसभा मतदार संघातून सोडत पद्धतीने निवडलेल्या प्रत्येकी 5 व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात येणार आहे.


अशाप्रकारे होणार कर्मचाऱ्यांची नेमणूक :मतमोजणीसाठी प्रत्येक मतदार संघनिहाय आणि प्रत्येक टेबलनिहाय मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून एकूण 117 मतमोजणी पर्यवेक्षक, 130 मतमोजणी सहायक, 120 सूक्ष्म निरीक्षक आणि इतर 101 सहाय्यक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराला ईव्हीएम मतमोजणी, ईटीपीबीएस आणि पोस्टल बॅलेट पेपर मतमोजणीसाठी एका टेबलसाठी एक याप्रमाणे 97 प्रतिनिधी नेमता येणार आहे. त्यासाठी फॉर्म नं. 18 भरून आवश्यक आहे. मतमोजणी कक्षात प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधीसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीस्थळी उमेदवारांच्या प्रतिनिधींकरिता कम्युनिकेशन कक्ष, पत्रकारांसाठी मीडिया कक्ष तसेच उमेदवारांकरिता कक्ष स्थापन केलेला असून सर्व कक्ष सुसज्ज आहेत. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही नियंत्रणाखाली राहणार आहे.

सुरक्षा यंत्रणा सज्ज :वीज पुरवठा अखंड सुरू राहावा यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने तसेच भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले दोन निवडणूक निरीक्षक, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरीक्षणाखाली संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडणार आहे. मतमोजणीस्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेची देखरेख आहे. यात बाह्य स्तरावर महाराष्ट्र पोलीस दल, दुसऱ्या स्तरावर राज्य राखीव पोलीस दल तर आतील स्तरावर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. मतमोजणी कक्षात मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू, तसेच निवडणूक आयोगाने प्रतिबंध केलेल्या वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. निवडणूक निकालाचा परिणाम शेअर बाजारावर काय होणार? जाणून घ्या सविस्तर.... - Lok Sabha Election Results 2024
  2. मतमोजणीसाठी राज्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज; सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी - lok sabha election results 2024
  3. राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून शरद पवार आक्रमक; मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र - Sharad Pawar On CM Eknath Shinde

ABOUT THE AUTHOR

...view details