महाराष्ट्र

maharashtra

9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम 'स्केच'च्या आधारे जेरबंद - Minor Girl Sexual Abuse

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 3 hours ago

Minor Girl Sexual Abuse : नागपूर शहरात नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत नराधमानं चिमुकलीवर अत्याचार केला. 'स्केच'च्या आधारे या आरोपीचा शोध सुरू होता.

Minor Girl Sexual Abuse
'स्केच'च्या आधारे आरोपीला अटक (Source - ETV Bharat Reporter)

नागपूर Minor Girl Sexual Abuse : नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला स्केच'च्या आधारे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. नराधमाला अटक केल्याचं पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांनी सांगितलं. नागपुर शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन आरोपीबाबत खुलासा करणार आहेत.

घटनेला सहा दिवस उलटूनही आरोपी सापडत नसल्यानं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर आज पारडी पोलीस ठाण्यात आंदोलन करणार होत्या. मात्र, त्याआधीच आरोपी सापडल्यामुळं किशोरी पेडणेकर यांनी आंदोलन मागं घेतलं. आरोपीला कठोर शिक्षा होईल या अनुषंगानं पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

किशोरी पेडणेकर (Source - ETV Bharat Reporter)

असा घडला होता घटनाक्रम : 9 वर्षीय पीडित मुलगी तिच्या 4 वर्षांच्या बहिणीसह घरी होती. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. दुचाकीवरून एक 40 वर्षीय इसम त्यांच्या घरी आला. घरी कोणी नसल्याचं लक्षात येताच त्यानं 9 वर्षीय मुलीला आतील खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीनं पीडितेच्या चार वर्षांच्या बहिणीला शांत राहण्यासाठी 20 रुपये दिल्याचंही तपासात समोर आलंय.

घरी कुणी नसल्याचा घेतला गैरफायदा : पीडित मुलीचं कुटुंब तीन वर्षांपूर्वी कामा-धंद्याच्या शोधात नागपुरात राहायला आले. घटनेच्या दिवशी ते सकाळी कामावर गेले होते. त्यामुळं घरात 9 आणि 5 वर्षांच्या दोन मुली होत्या. दुपारी आरोपी त्यांच्या घरी आला. त्यानं मुलींना त्यांच्या पालकांबद्दल विचारलं. त्यावेळी मुलींनी घरी कोणी नसल्याचं सांगताच आरोपीनं घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार केला.

'स्केच'च्या आधारे आरोपी जेरबंद : घटनेनंतर मुलींचे आई-वडील घरी आले तेव्हा मुलींनी सर्व घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पालकांनी पारडी पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. आरोपी अनोळखी असल्यानं पोलिसांनी 'स्केच' तयार करून आरोपीचा शोध सुरू केला.

हेही वाचा

  1. इंजेक्शन देऊन बेशुद्ध अवस्थेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 2 वर्षानंतर आरोपीला अटक - Minor Girl Sexual Abuse
  2. जमिनीत अचानक खड्डा पडून कोसळला ट्रक; पाहा सीसीटीव्ही, नेमकी भानगड काय? - Pune Truck Collapsed
  3. क्रिप्टोकरंन्सीचा नवा झोल; तपास यंत्रणा पोलीस संभ्रमात, सात जणांना अटक - Sambhaji Nagar Crime News
Last Updated : 3 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details