महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विमान कंपन्या आणि रेल्वेला स्फोटाची धमकी देणारा 'जगदीश उईके' कोण? - THREAT MAIL

विमान कंपन्यात, रेल्वेत स्फोट घडवू अशा आशयाचा धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याचं नाव समोर आलं आहे. सध्या दिल्ली, नागपूर आणि गोंदियामध्ये या आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Threat Mail
धमकीचा मेल (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 10:17 PM IST

नागपूर: विमान कंपन्या आणि रेल्वेला स्फोटाची धमकी देणारे ईमेल पाठवणारा 'जगदीश उईके' नामक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याचं नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसात देशातील अनेक विमानतळांना बॉम्बनं उडवून देण्याच्या धमकीचे ईमेल प्राप्त झाले होते. त्यामुळं तपासणी आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळं अनेक विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्या होता. त्यामुळं विमान कंपन्याचं कोट्यवधींचं नुकसान झालं होतं. सर्व प्रकरणात जगदीश उईके नामक आरोपीचा सहभाग असल्याचं तपासात पुढे आलं आहे.

कोण आहे आरोपी : जगदीश उईके हा गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील ताडगावचा रहिवासी असल्याची माहिती पुढे आली. मात्र, २०१६ पासून तो गोंदिया सोडून गेलेला होता. त्यानं गोंदिया मधील त्याचे घरही विकले होते. जगदीश उईके आपल्या आई-वडिलांसोबतही राहत नव्हता. २०१६ पासून तो कुठे आहे हे अद्याप स्पष्ट नाही. २०२१ मध्ये त्याला एका वेगळ्या प्रकरणात पकडण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर तो कुठे आहे, याची कोणालाच माहिती नाही.



दहशतवादावर लिहिलं पुस्तक :विमान कंपन्या तसेच वेगवेगळे विमानतळ आणि रेल्वेला धमकीचे ईमेल पाठवणारा ३५ वर्षांचा जगदीश उईके गोंदियाचा आहे. दहशतवादावर त्याने एक पुस्तकही लिहिलं असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.



टेरर कोड डी कोड केला असल्याचा दावा :नुकताचं आशा आशयाचे एक ईमेल रेल्वेमंत्री यांच्यासह रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वेशी संबंधित अनेक कार्यालयांमध्ये आले होते. मी एक टेरर कोड डी कोड केला आहे. असा दावा त्या ई-मेलमध्ये करून पुढील पाच दिवसात देशातील विविध रेल्वे स्टेशन आणि रेल्वे विभागाच्या परिसरामध्ये ३० पेक्षा जास्त स्फोट होतील असा आशय त्या ई-मेलमध्ये होता. या संदर्भात जेव्हा सुरक्षा यंत्रणांनी सखोल तपास केला. तेव्हा या ईमेल मागे जगदीश उईके नावाचा तरुण असल्याचं समोर आलं.



दिल्ली, नागपूर आणि गोंदियात शोध सुरू : जगदीश उईके हा मूळचा गोंदियाचा असला तरी, सध्या तो गोंदियामधून बेपत्ता आहे. विशेष म्हणजे जगदीश उईकेला २०२१ मध्ये पोलिसांनी धमकीचे ईमेल प्रकरणी अटक केली होती. त्यावेळच्या चौकशीत जगदीश उईके मानसिक अस्थिर असल्याची बाब तपास यंत्रणांच्या लक्षात आली होती. सध्या जगदीश उईकेचे शेवटचे लोकेशन दिल्लीतील कनाट प्लेसमध्ये मिळाली होती. सध्या दिल्ली, नागपूर आणि गोंदियामध्ये त्याचा शोध सुरू असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा -

  1. महायुतीत भाजपा तर महाविकास आघाडीत काँग्रेसच 'थोरला भाऊ'; शरद पवार अजित पवारांवर पडले भारी
  2. बडनेरात भाजपा 'फिफ्टी-फिफ्टी'; रवी राणा महायुतीचे अधिकृत उमेदवार, तुषार भारतीयांची बंडखोरी
  3. भाजपाचा तीव्र विरोध डावलून नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवारी

ABOUT THE AUTHOR

...view details